नवी दिल्ली : स्वयंघोषित सायबरतज्ज्ञ सय्यद शूजा याने 2014 च्या निवडणूकीत ईव्हीएम मशिनमध्ये घोळ झाल्याचा खळबळजन खुलासा केला होता. आपण मतदानयंत्र तयार करणाऱ्या चमूचे सदस्य असल्याचाही शुजाचा दावा आहे. पोलिसांनी या आरोपांची सुयोग्य चौकशी करावी, अशी मागणी निवडणूक आयोगानं आपल्या तक्रारीत केली आहे. त्यानंतर याच्याविरोधात निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सय्यदचा समाचार घेतला होता. लंडनमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकार परिषद घेऊन शुजानं गंभीर आरोप केले होते. ईव्हीएमवर आरोप करुन शूजा थांबला नाही. तर त्याने गोपिनाथ मुंडेंच्या मृत्यूबद्दलही संशय व्यक्त केला आहे. पण आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीने शूजा सोबतचे संबंध नाकारले आहेत. ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.
निवडणूक आयोगासाठी ईव्हीएम मशिन हॅक करण्याचा हॅकर शूजा याचा दावा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडीया लिमिटेड ( ईसीआयएल) ने नाकारले आहेत. स्वघोषित सायबर तज्ञ सैयद शुजा हा 2009 ते 2014 या काळात कंपनीच्या कोणत्याही कामाशी संबंधित नव्हता असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. ईसीआयएलचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक रियर एडमिरल संजय चौबे (सेवा निवृत्त) यांनी मंगळवारी शूजाच्या आरोपांचे खंडन केले.
2009 ते 2014 या काळात शूजा हा कंपनीचा नियमित कर्मचारीही नव्हता किंवा ईव्हीएम डिझाइन आणि डेव्हलमेंटच्या कोणत्याही कामात सहभागी नव्हता, असे कंपनीचे जुने रेकॉर्ड पाहून स्पष्ट झाल्याचे चौबे यांनी सांगितले. उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन यांना लिहिलेल्या पत्रात देखील चौबे यांनी ही माहीत दिली.
आपण इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लिमिटेडचा २००९ ते २०१४ या कालावधीत कर्मचारी होतो असे शुजाने सांगितले आहे. भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिन्स डिझाईन केल्याचेही त्याचे म्हणणे आहे. ग्रेफाईट ट्रान्समीटरच्या मदतीने या ईव्हीएम मशिन्स उघडता येतात. २०१४ मध्ये भाजपने या ट्रान्समीटरचा वापर केला होता. यानंतरच्या काळात माझ्यावर आणि सहकाऱ्यांवर हल्ले झाल्याचेही शुजाने केलेल्या आरोपात म्हटले आहे
शूजाच्या लंडनमधील पत्रकार परिषदेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात भाजपने मतदान यंत्रे कशी हॅक केली?. मतदान यंत्रणा हॅक झाल्याचे शुजाला माहित होतं, तर तो कालपर्यंत गप्प का होता? काँग्रेसचे खासदार कपिल सिब्बल एकटेच या पत्रकार परिषदेत काय करत होते? भारताविषयीच्या इतक्या महत्वाच्या मुद्द्यावर इंडियन जर्नलिस्ट असोशिएशनने शुजाला लंडनमध्ये व्यासपीठ का दिला?. 2018 मध्ये काँग्रेसने ज्या विधानसभा निवडणुका जिंकल्या त्यावेळी मतदानयंत्रात छेडछाड झाली नाही का? हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.