'या' ठिकाणी पुरुषांना करावी लागतात दोन लग्न, नकार दिल्यास होते जन्मठेपेची शिक्षा

जाणून घ्या कोणतं ठिकाण आहे हे...  

Updated: Aug 13, 2022, 03:00 PM IST
'या' ठिकाणी पुरुषांना करावी लागतात दोन लग्न, नकार दिल्यास होते जन्मठेपेची शिक्षा title=

मुंबई : लग्न हे अत्यंत पवित्र बंधन मानलं जातं. एकाच राज्यात लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती पाहायला मिळतात, एवढंच काय तर प्रत्येक देशाच्या लग्नाच्या वेगळ्या पद्धती असतात. त्यांचे परंपरेनुसार लग्न होतं. पण काही ठिकाणी लग्नाच्या काही विचित्र परंपरा नाही तर नियम आहेत. एक असा देश आहे जिथे दुसऱ्या लग्नाला कोणत्या पुरुषाने नकार दिल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. यासाठी एक कायदा देखील काढण्यात आला आहे. 

आणखी वाचा : 'तुमचे हिंदी सिनेमे जरुर चालवा पण त्यासाठी मराठीचा बळी का?' अमेय खोपकरांनी केला सवाल

मिळालेल्या माहितीनुसार, आफ्रिका खंडातील इरिट्रिया या देशात प्रत्येक पुरुषाला दोनवेळा लग्न करावे लागते. मग ही गोष्ट त्याला आवडत असो किंवा नाही. एवढंच नाही तर पुरुषाच्या दोन पत्नी नसतील तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाते. जो पुरुष असं करत नाही त्याला जन्मठेपेची शिक्षा होते. 

आणखी वाचा : सुझानला बॉयफ्रेंडसोबत अशा अवस्थेत पाहिल्यानंतर ट्रोलर्स म्हणाले, 'याच्यापेक्षा हृतिक लाखपट...

दरम्यान, इरिट्रियामध्ये हा अनोखा कायदा बनवण्याचा कारण येथे असलेली महिलांची लोकसंख्या आहे. खरं पाहायला गेलं तर या देशात पुरुषांची संख्या ही महिलांच्या तुलनेत खूपच कमी आहे. या मागचं खरं कारण म्हणजे इथिओपियासोबतचे गृहयुद्ध. पुरुषांसाठी दोन विवाह करण्याच्या कायद्याशिवाय महिलांसाठीही कठोर कायदे करण्यात आले आहेत. येथील महिला पुरुषांना दोनदा लग्न करण्यापासून रोखू शकत नाहीत. जर महिलांनी पुरुषांना लग्न करण्यापासून रोखले तर त्यांना तुरुंगवासही होऊ शकतो.

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

या विचित्र कायद्यामुळे इरिट्रिया या देशावर बरीच टीका होत आहे. कारण असे नियम आपल्याला कुठे पाहायला मिळत नाहीत. लग्नाच्या नियमांव्यतिरिक्त येथे अनेक अनोखे कायदे देखील आहेत.