नवी दिल्ली : इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने (Equitas Small Finance Bank) केवळ महिलांसाठी एक खास बचत खाते सुरू केले आहे. या बचत खात्यावर महिलांना ७ टक्क्यांनुसार व्याज मिळणार आहे. या खास बचत खात्याचं नाव 'इवा बचत खाते' असं आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतीय क्रिकेट संघाची क्रिकेटपटू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिला बँकेने ब्रँड अॅम्बेसेडर केले आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने असे निवेदनात म्हटले आहे की, इवा या बचत खात्यामध्ये सर्व महिला पैसे गुंतवू शकतात. नोकरी करणाऱ्या महिला, गृहिणी, उद्योजक महिला, ज्येष्ठ महिला, ट्रान्सजेंडर आणि अनिवासी महिलाांना इवा बचत खात्याचा फायदा होणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे बँकेने ७ टक्के व्याज दराशिवाय मोफत आरोग्य तपासणीची देखील सुविधा देखील दिली आहे. तसेच महिला डॉक्टर, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांशी अमर्यादित दूरध्वनी-सल्लामसलत करू शकतात.
Equitas Small Finance Bank अध्यक्ष आणि देश प्रमुख मुरली वैद्यनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने लोकांना खास करून महिला सबलीकरणाचे काम हाती घेतले आहे. बँकेच्या या योजनेमुळे महिलांना त्यांच्या उत्पादनांद्वारे आर्थिक निर्णय घेण्यास आणि सशक्त होण्यास मदत होणार आहे.