नवी दिल्ली : कोणत्याही खासगी मर्यादित (Private Limited), सरकारी(Government) किंवा निमशासकीय कंपनीतील (Semi Government Company) कर्मचार्यांच्या पगारामधून पीएफ वजा कापला जातो. आपण नोकरी बदलून आधीच्या कंपनीकडून आपला पीएफ हस्तांतरित करून घेऊ शकता.
खासगी कंपन्यांचे कर्मचारी जुनी कंपनी सोडून नवीन ठिकाणी जातात. बदललेली कंपनी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम (provident fund) लक्षात ठेवणे आणि त्यांचा मागोवा घेणे हे अडचणीचे ठरु शकते. या पद्धतीने तुम्ही पीएफबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता
(Can transfer through e-passbook) EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था) 12 अंकी नंबर देते, त्याला UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) म्हटले जाते. जे एक्टीव्ह केल्यावर तुमच्या खात्यावर ऑनलाईन लक्ष ठेवलं जातं. यूएएन आयडी त्याच्या सदस्यांसाठी छत्री श्रumbrella)म्हणून काम करते.
हा नंबर ईपीएफओमध्ये नोंदणीकृत कंपन्यांना देण्यात येतो. ज्याच्या मदतीने कंपन्या आपल्या कर्मचार्यांच्या ईपीएफमध्ये पैसे जमा करतात. बँकेच्या पासबुकप्रमाणेच, आपल्या खात्याची रक्कम 'e-passbook' लिंकद्वारे ईपीएफ वेबसाइटवर देखील पाहू शकता. वेगवेगळ्या कंपनीत सदस्यांचा बॅलेंस वेगवेगळा असता.
ईपीएफओने यासाठी'One Member– One EPF account' चा ऑनलाईन पर्याय दिला आहे. ही एक प्रकारची
ट्रान्स्फर रिक्वेस्ट आहे. ट्रान्सफरद्वारे सदस्याचे संपूर्ण शिल्लक एकाच ईपीएफ खात्यात एकत्रित केले जाते. परंतु या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावरच ऑनलाइन ट्रान्सफर रिक्वेस्ट मान्य केली जाते.
स्टेप 1- हस्तांतरित करण्याच्या मागील खात्यांचा तपशील निवडा. EPFO साठी GET MID बटण असते. जे मागील कंपन्यांची माहिती देते.
स्टेप 2-ओटीपीद्वारे वेरिफाईड केले जाईल
स्टेप 3 - ओटीपीचा उद्देश ट्रान्स्फर रिक्वेस्ट वेरिफाईड करणे आहे. एकदा आपण 'Get OTP' वर क्लिक केल्यास आपल्या रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. हा प्रविष्ट केल्यावर ट्रान्सफर रिक्वेस्ट पूर्ण होईल.
शेवटी, आपल्या कंपनीच्या administration department ला ट्रान्सफर रिक्वेस्टची एक प्रत द्यावी लागेल. ईपीएफओच्या ऑनलाइन सेवांच्या मेनूमध्ये दिलेल्या 'track claim status'पर्यायासह तुम्ही रिक्वेस्टची पीडीएफ प्रत डाउनलोड करू शकता.
यूएएन खात्यात सर्व रक्कम साधारणत: 20 दिवसात जमा होते.