नवी दिल्ली : एल्गार परिषदेच्या निमित्तानं देशात अराजक पसरवण्याचा कट रचल्याप्रकरणी स्थानबद्ध करण्यात आलेल्या पाच जणांच्या समर्थनात दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी झालेल्या गेल्या सुनावणीत पुणे पोलिसांनी आज आपली बाजू मांडावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीत म्हटलं होतं. त्यानुसार पोलीस आज आपली भूमिका मांडणार आहेत.
अधिक वाचा : भीमा कोरेगाव अटकसत्र : मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्र सरकारला नोटीस
उच्च न्यायालयानं याआधीच पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून पोलिसांचे आधीच कान उपटले आहेत. त्यामुळे आज सर्वोच्च न्य़ायालयात सुनावणी पुणे पोलिस नेमकं काय सांगतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.
अधिक वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये नक्षलवाद्यांचं जाळं उभारायला सुरुवात