शिकवता शिकवता मास्तर हळूच घ्यायचे पेग, गावात समजल्यावर अशी झाली फजिती!

गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली अन्...

Updated: Oct 2, 2022, 11:48 PM IST
शिकवता शिकवता मास्तर हळूच घ्यायचे पेग, गावात समजल्यावर अशी झाली फजिती! title=

Drunk Teacher With Beer Cans: भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला देवाचा दर्जा दिला जातो. व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये गुरूची भूमिका महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे, आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक अथक प्रयत्न करत असतात. मात्र. शिक्षकाच्या पदाला काळिमा फासण्याचं काम हासरथमधील एका शिक्षकाने (Hathras Crime news) केलं आहे. या शिक्षकाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक शिक्षक वर्गात मुलांसमोर बिअर पिताना दिसत आहे. वर्गातील मुले जमिनीवर बसली असून खुर्चीवर बसलेले शिक्षक मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. ही बातमी गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली.

शिक्षक मद्यधुंद असताना गावातील काही लोकांनी व्हिडीओ काढला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शिक्षक दारूच्या बाटल्या लपवताना दिसत आहे. एक बियरची बाटली खाली जमिनीवर तर दुसरी बॉटल खुर्चीच्या मागे लपवलेली दिसत आहे (Drunk Teacher With Beer Cans). लोकांनी चोरी पकडल्यानंतर शिक्षक बाटल्या लपवण्याचा प्रयत्न केलतो.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील शिक्षकावर कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा सुचना कार्यालयाने दिली आहे. गावकऱ्यांनी देखील शिक्षकाच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

 सासरी चाललेल्या नवरीला अचानक काय झालं? गाडीत नवऱ्याला धु धु धुतला, तुम्हीही खळखळून हसाल!

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांना (Uttar Pradesh Police) शिक्षकावर कारवाई करण्याची विनंती केली.