करुणानिधी अनंतात विलीन, समर्थकांचा जनसागर लोटला

करुणानिधींवर मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले. करुणानिधींच्या अत्यंदर्शनासाठी समर्थकांचा जनसागर लोटला होता. 

Updated: Aug 8, 2018, 11:27 PM IST
करुणानिधी अनंतात विलीन, समर्थकांचा जनसागर लोटला title=

चेन्नई : द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते आणि द्रविड राजकारणाचे प्रणेते एम करुणानिधी यांचे चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी मंगळवारी सायंकाळी निधन झाले. करुणानिधी यांचे पार्थिव बुधवारी सकाळी चेन्नईतील राजाजी हॉल येथे नेण्यात आले. राजाजी हॉल येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.  सांयकाळी करुणानिधींवर मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले. करुणानिधींच्या अत्यंदर्शनासाठी समर्थकांचा जनसागर लोटला होता. 

दिग्गजांनी घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन

तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद पाचवेळा भूषवणारे मुथुवेल करुणानिधी यांच्यानिधनानंतर शोकाकुल अवस्थेतील हजारो समर्थकांनी हॉलबाहेर रांगा लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतले. याआधी अभिनेता रजनीकांत, कमल हासन यांनीदेखील अंत्यदर्शन घेतले होते. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, राज्य मंत्री डी जयकुमार आणि केंद्रीय मंत्री राधाकृष्णन यांनी करूणानिधींना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अंत्ययात्रेत सहभागी तर फारुख अब्दुल्ला, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी श्रद्धांजली वाहिली.

करुणानिधी यांचे पार्थिव बुधवारी सकाळी चेन्नईतील राजाजी हॉल येथे नेण्यात आले. राजाजी हॉल येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.  सांयकाळी करूणानिधींवर मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू

दरम्यान, करुणानिधींच्या अत्यंदर्शनासाठी समर्थकांचा जनसागर लोटला होता. समर्थक नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. दरम्यान चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत.