राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा लढत

द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, पाहा कधी लागणार निकाल?

Updated: Jul 18, 2022, 08:37 AM IST
राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा लढत title=

नवी दिल्ली : देशांतील सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती पदासाठी आज मतदान होत आहे. NDAडून द्रोपदी मुर्मू तर UPA कडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. मुंबईत विधानभवन येथे सकाळी 10 ते सायंकाळ 5 असे मतदान होणार आहे. भाजपा आणि शिंदे शिवसेना गट यासह शिवसेना खासदार यांनी ही NDA उमेदवारस पाठिंबा दिल्याने एनडीए बाजू भक्कम झाली. 

दुसरीकडे राज्यातील विरोधकात एकजूट नाही त्यात शिवेसना फूट - खासदारांचा पाठिंबा यामुळे विरोधकांच्या कळपात हवा गूल आहे. काँग्रेस आणि एनसीपी आमदार मतदान किती होते नेमके कोणास करतात याकडे ही लक्ष आहे. आज होणा-या या निवडणुकीत खासदार आणि आमदार मतदान करणार आहेत. 

देशभरातील आमदार-खासदारांचं संख्याबळ लक्षात घेतलं तर द्रौपदी मुर्मू यांची निवड निश्चित मानली जात आहे. देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू सहज निवडून येतील, अशी स्थिती आहे. 

महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांसह शिवसेनेचे आमदार-खासदारही राष्ट्रपतीपदासाठी मुर्मू यांनाच मतदान करणार आहेत. या निवडणुकीचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. 

उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांच्यावतीनं काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळं आता उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपचे जगदीप धनकड विरुद्ध काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा अशी लढत होणार आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी रविवारी झालेल्या बैठकीत अल्वांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 

शिवसेनेसह 17 राजकीय पक्षांनी अल्वा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय. मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश, सीताराम येचुरी, संजय राऊत, रामगोपाल यादव, टी. आर. बालू, राजा आदी नेते बैठकीला उपस्थित होते.