Son Brutally Killed Parents: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) फिरोजाबाद (Firozabad) येथे एक धक्कादायक हत्याकांड (Murder Case) समोर आलं आहे. या ठिकाणी एका तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने डबल मर्डर (Uttar Pradesh Crime) केला आहे. या तरुणाने आपल्याच आई-वडिलांची भरस्त्यात गोळ्या घालून हत्या केली आहे. नगला रमिया गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आई वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आरोपी तरुण फरार झाला आहे. पोलिस सध्या या तरुणाचा माग घेत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार राकेश सिंह आणि गुड्डी देवी अशी हत्या करण्यात आलेल्या दांपत्याचं नाव आहे. स्थानिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संपातलेला हा तरुण आणि त्याचे काही मित्र त्याच्या आई-वडिलांनी प्राण सोडेपर्यंत त्यांच्यावर गोळीबार करत होते. पोलिसांनी या दोघांची हत्या संपत्तीच्या वादातून करण्यात आल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश असं आरोपाची नाव आहे.
राकेश सिंह आणि गुड्डी देवी हे दोघेही त्यांचा धाकटा मुलगा सीटूबरोबर एटामध्ये राहत होते. ते आपल्या मूळ गावी परत येत असताना त्यांना रस्त्यातच त्यांच्या योगेश नावाच्या थोरल्या मुलाने गाठलं. दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या आई वडिलांना रस्त्यातच अडवून योगेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दोघांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. ऐन रहदारीच्या रस्त्यावर हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. लोक सैरावैरा पळू लागली. हल्लेखोर पळून गेल्यानंतर राकेश आणिु गुड्डी यांच्या मृतदेहाभोवती लोकांनी घोळका केला. पोलिसांना यासंदर्भातील माहिती कळवण्यात आली. त्यानंतर तातडीने पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली.
या हल्ल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यांनी धाकट्या मुलाकडे म्हणजेच सीटूकडे चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. सीटू हा पदवीचं शिक्षण घेत आहे. योगेश आणि त्याच्या पत्नीने घरावर ताबा मिळवला. त्यानंतर त्यांना राकेश आणि गुड्डीच्या मालकीची जामीनही हवी होती. यासाठी ते दोघेही प्रयत्न करत होते. त्यामुळेच राकेश आणि गुड्डी एटामध्ये धाकट्या मुलाबरोबर राहत होते. सीटूने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, योगेशच्या सासरवाडीचे लोकही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांनी अनेकदा योगेशला वाईट कामांसाठी मदत केल्याचा आरोप धाकट्या भावाने केला आहे. आई-वडिलांनी कोणालाही संपत्तीमध्ये वाटा देऊ नये असं योगेशला वाटत होतं. याच कारणामुळे त्याने आई-वडिलांची हत्या केली.