नवी दिल्ली: संपूर्ण देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू होण्याअगोदर काही वस्तूंचे भाव कमी होतील तर काही किमती वाढतील असं म्हटलं जात होतं. एक जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर आता घरगुती सिलेंडरची किंमत वाढली आहे. आता तुम्हाला एलपीजी सिलेंडर घेण्याकरता पूर्वीपेक्षा जास्त 32 रुपये अधिक खर्च करावे लागणार आहे.
जीएसटी लागू झाल्यानंतर सब्सिडीमध्ये कपात केल्यामुळे सिलेंडरचे भाव वाढले. जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक राज्यांना एलपीजीसाठी टॅक्स नव्हता द्यावा लागत होता. पण काही राज्यांमध्ये यावर 2 ते 4% इतका वॅट आकारला जात होता. पण आता एलपीजी 5 टक्क्याच्या स्लॅबमध्ये ठेवला आहे त्यामुळे त्याची किंमत १२ ते १५ रुपयांनी महागणार आहे.
इकॉनॉमिक टाइम्सनुसार जूनपासून सरकारने एलपीजी सबसिडीमध्ये कपात केली आहे. उदाहरणार्थ जर एखाद्याला जर 119 रुपये सब्सिडी येत होती तर त्याला आला 107 रुपये सबसिडी मिळेल. जीएसटी आणि सबसिडीमुळे आता 30-32 रुपयांची वाढ होणार आहे.
पण जीएसटी लागू झाल्यामुळे कमर्शियल एलपीजी सिलेंडरमागे 69 रुपये कमी झाले आहेत. या आधी कमर्शियल सिलेंडरवर 22.5% पर्यंत कर लागत होता आणि तो 18 टक्क्यावर आला आहे.
शिवाय एलपीजी वापरणाऱ्यांना दोन वर्षात तपासणी, इन्स्टॉलेशन आणि प्रशासकीय शुल्कही द्यावा लागणार आहे. हा चार्ज अशामुळे आहे कारण नवीन जोडणीचं आता डॉक्यूमेंटेशन केले जाणार आहे. एलपीजीला 5 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये ठेवले आहे.