मुंबई : काँग्रेस पक्षातील नेते आणि राहुल गांधी गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावर अॅक्टिव दिसत आहे. या अगोदर काँग्रेस पक्ष सोशल मीडियावर एवढा अॅक्टिव्ह नव्हता. याचं कारण आहे एक व्यक्ती. जी बनली राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया गुरू. सुरूवातीला या व्यक्तीला कार्यकर्त्यांनी नाकारलं पण जेव्हा राहुल गांधींना हिच्यातील गुणांची जाणीव झाली तेव्हा तिच्याकडे पक्षाच्या सोशल मीडियाची जबाबदारी आली. ब्यूटी विथ ब्रेन असलेल्या या व्यक्तीने सोशल मीडियाद्वारे पक्षाचे सर्व रूपच बदलले. गेल्या वर्षभरापासून राहुल गांधी ज्या पद्धतीने सामान्यांपर्यंत पोहोचत आहे हे या व्यक्तीमुळे शक्य झालं.
'ब्युटी विथ ब्रेन' असलेली ही व्यक्ती कन्नड सिनेमांत अभिनेत्री होती. तिने आता राजकारणात प्रवेश केला आहे. आणि राजकारणातील मोठा पक्ष काँग्रेसचा रंग रूप बदलण्याचा निर्णय तिने घेतला आहे. ही व्यक्ती आहे दिव्या स्पंदन उर्फ रम्या. कर्नाटकच्या बंगलुरूमध्ये 29 नोव्हेंबर 1982 मध्ये रम्याचा जन्म झाला. रम्याच्या कुटुंबातील अनेक व्यक्ती राजकारणाशी जोडलेले आहेत. त्यामुळे राजकारण तिच्या रक्तातच आहे. रम्याचे आई वडिल मांड्यात राहणारे असून तिचं शिक्षण उटी आणि चैन्नईत झालं आहे. रम्याची आई रंजीता काँग्रेस पक्षाची कर्नाटक विंगमधील वरिष्ठ सदस्य आहे. तर तिचे आजोबा उद्योगपती आहेत. रम्याचं खरं नाव हे दिव्या स्पंदन आहे. मात्र सिनेसृष्टीत प्रवेश केल्यावर तिला रम्या या नावानेच ओळखण्यात आलं. तिला हे नाव अभिनेता राजकुमार यांची पत्नी पर्वथम्माने दिलं आहे.
दिव्याने आपल्या फिल्मी करिअरला 2003 मध्ये कन्नड भाषेतील सिनेमातून सुरूवात केली. रम्याला सर्वोत्कृष्ठ कन्नड अभिनेत्री म्हणून दोन वेळा फिल्म फेअर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यानंतर 2013 मध्ये तिने राजकारणात प्रवेश केला. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत मांड्यामध्ये 5500 मतांनी रम्या हरली. आता ती काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशन सांभाळत आहे. हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. सुरूवातीला नवीन कार्यकर्ता म्हणून संबोधल जात असे. त्यानंतर 2017 मध्ये राहुल गांधीने आपल्या पक्षाची सोशल मीडियाची जबाबदारी दिव्याकडे दिली. त्यानंतर तिने आपली टीम वाढवली आहे. फक्त 3 महिलांचा समावेश करून घेतला. आणि काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियामध्ये जवळपास 85 टक्के वाढ झाली.