नगराध्यक्षांवर बाजारात भजी तळण्याची वेळ; तुमच्या नजरेस पडलं तर आश्चर्य वाटायला नको

National news : असं म्हणतात काम कोणतंही असो. लहान किंवा मोठं, ते करत असताना मनात कोणताही संकोचलेपणा नसावा. 

Updated: Dec 9, 2022, 12:35 PM IST
नगराध्यक्षांवर बाजारात भजी तळण्याची वेळ; तुमच्या नजरेस पडलं तर आश्चर्य वाटायला नको  title=
dipmala a Young mayor runs pakoda stall at the weekly market in ranapur madhya pradesh latest marathi news

Nationa news : असं म्हणतात काम कोणतंही असो. लहान किंवा मोठं, ते करत असताना मनात कोणताही संकोचलेपणा नसावा. कारण, याच कामाच्या बळावर आपण दोन वेळचं अन्न मिळवण्यास समर्थ असतो. याच कामामुळं अनेकदा आपली ओळखही तयार होते. अशीच ओळख झालीये एका नगराध्यक्षांची. आता तुम्ही म्हणाल नगराध्यक्ष म्हणजे तसं मोठंच पद. पण, याच पदावर असूनही एक तरुणी तिच्या वाट्याला आलेलं काम अजिबात चुकवत नाही. त्यामुळं तुम्ही कधी बाजारपेठेत गेलात आणि ही तरुणी तिथे तुम्हा भज्या तळताना दिसली तर, आश्चर्य वाटू नये.  (India news )

नगराध्यक्षांची ही आगळीवेगळी ड्यूटी कुठे असते? 

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) झाबुआ जिल्ह्यात असणाऱ्या राणापूर नगर येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात या नगराध्या भजी तळण्याचं काम करतात, दुकानात येणाऱ्या ग्राहकांना चहा आणि भजी देतात, आपलं काम चोखपणे पार पाडतात. या नगराध्यक्षांचं नाव आहे, दीपमाला. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी दीपमाला यांनी नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. (dipmala a Young mayor runs pakoda stall at the weekly market in ranapur madhya pradesh latest marathi news)

हेसुद्धा वाचा : Sonia and Rajiv Gandhi Love Story : सोनिया यांच्यावरील जीवापाड प्रेमापोटी राजीव गांधींनी असं काही केलं जे कुणी करुच शकणार नाही 

आई आणि वडील नगरसेवक असल्यामुळं त्यांना राजकारणाला वारसा कुटुंबातूनच मिळाला होता. पण, त्यांनाही मागे टाकत त्यांच्या लेकिनं कमालच केली. इतक्या कमी वयात नगराध्यक्षपद मिळवल्यामुळं ती कौतुकास पात्र ठरली. भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या दीपमाला या सर्वात तरुण नगराध्यक्षा ठरल्या. 

...तरीही पाय जमिनीवर 

एका मोठ्या हुद्द्यावर तितकीच महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असूनही दीपमाला यांनी कधीच मनात गर्व वाढू दिला नाही. उदरनिर्वाहाचं साधन असणाऱ्या चहा आणि भजीच्या दुकानात त्यांनी काम करणं सुरुच ठेवलं. आईला मदत करण्यासाठी म्हणून त्यांनी आपलं काम आवरून इथं येत तिला मदत केली आणि या लेकिवरच येणाऱ्या- जाणाऱ्यांच्या नजरा खिळल्या. 

तिन्ही भावंडांमध्ये सर्वात धाकटी असूनही दीपमालानं तिच्या खांद्यावर मोठी जबाबदारी घेतली आहे. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यांच्या शंकांचं निरसन करणं ही सर्व कामं दीपमाला अगदी सहजपणे पार पाडत आहेत. यातूनच वेळ मिळेल तेव्हा प्रत्येक क्षणी त्या कुटुंबीयांसोबत दुकानातही हातभार लावत आहेत. साधी राहणी उच्च विचारसरणी म्हणतात ते हेच... नाही का?