काय तुमचे मतदार ओळखपत्र हरवले? डुप्लीकेटसाठी अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज

आता चिंता करण्याची काहीच गरज नाही.

Updated: Mar 12, 2019, 04:52 PM IST
 काय तुमचे मतदार ओळखपत्र हरवले? डुप्लीकेटसाठी अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज  title=

मुंबई: मतदार ओळखपत्र गहाळ झाल्यामुळे किंवा चोरीला गेल्यामुळे अनेक लोकांना मतदान करताना अडचणी निर्माण होतात. मतदार ओळखपत्र गहाळ झाल्यावर संबधित व्यक्तींना जवळच्या मतदान केंद्रात जाऊन अर्ज करावे लागत होते. त्यानंतर डुप्लीकेट मतदार ओळखपत्र मिळत असे. या कामासाठी अनेकांना रजा घ्यावी लागत असे. मात्र, आता ओळखपत्र गहाळ झाल्यावर चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण, डुप्लीकेट ओळखपत्र मिळवण्याकरता सरकारने ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे. तसेच तुम्हाला रजा घेण्याची गरज लागणार नाही. मतदान ओळखपत्राचा उपयोग केवळ मतदान करण्यासाठी नाही, तर अनेक ठिकाणी याचा वापर केला जातो. महत्त्वाचे कागदपत्रे म्हणून देखील मतदान ओळखपत्र वापरले जाते. मतदान हे आपले केवळ हक्क नसून आपले कर्तव्यदेखील आहे, ही काळजी घेणे आवश्यक आहे.

 ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

याआधी डुप्लीकेट मतदार ओळखपत्र मिळवण्याकरीता मतदान केंद्रात जाऊन अर्ज भरावे लागत असे. मात्र, ऑनलाईन प्रक्रियेमुळे हे काम अगदी सोप्या पद्धतीने आणि घरी बसून केले जाऊ शकते. 
१)ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.nvsp.in/ या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करावा लागेल. 
२)त्यानंतर फार्म भरुन त्यात आवश्यक कागदपत्र जोडावे.
  - त्यामध्ये मतदार ओळखपत्र गाळ झाल्याची FRI प्रत आणि आधारकार्डची प्रत जोडणे आवश्यक आहे.
३) फॉर्मची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक रिफरन्स नंबर प्राप्त होईल. त्याच्या मदतीने आपले कार्ड तयार झाले का नाही याची माहिती प्राप्त होईल. त्यानंतर जवळच्या मदतान केंद्रात जाऊन मतदार ओळखपत्र मिळवू शकतात.