नवी दिल्ली : नर्मदा बचाओ आंदोलनच्या नेत्या मेधा पाटकर यांनी १७ व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलंय.
एसडीएम न्यायालयात मेधा पाटकर यांचा जामीन नाकारला गेलाय. पुढची सुनावणी १७ ऑगस्ट होणार आहे. त्यामुळे मेधा पाटकर यांचा स्वातंत्र्य दिन तुरुंगातच जाणार आहे.
दुसरीकडे शनिवारी कोटेश्वर नर्मदा तटावर आंदोलनकर्त्यांनीही उपोषण तोडलं. वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सायंकाळी मेधा पाटकर यांचं उपोषण तोडण्यासाठी धार तुरुंगात दाखल झाले होते.