Dhanteras 2023 Gold Silver Price : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थांमध्ये होणाऱ्या उलाढाली पाहता सोन्याचांदीच्या दरावर याचे थेट परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सातत्यानं हे दर कमी होताना आणि वाढतानाही दिसत आहेत. त्यातच धनतेरसच्या दिवशी (शुक्रवारी) सोन्याच्या दरांमध्ये काही अंशी घट झाल्याची बाब निदर्शनास आली. ज्यामुळं खरेदीदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
धनत्रयोदशीच्या दिवशी (Dhanters 2023) 22 कॅरेट सोन्याचे दर 55700 रुपयांवर आले. गुरुवारी हेच दर 56100 रुपये इतके होते. 22 कॅरेट सोन्याच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याचे दर 60760 रुपये असल्याचं स्पष्ट झालं. गुरुवारच्या तुलनेत या दरांमध्येसुद्धा घट नोंदवण्यात आली. बुलियन मार्केटच्या वृत्तानुसार चांदीचा दर प्रतिकिलो 71650 रुपये आहे
चेन्नई- 22 कॅरेट सोनं 56,450 रुपये; 24 कॅरेट सोनं 61,580 रुपये
मुंबई - 22 कॅरेट सोनं 56,000 रुपये; 24 कॅरेट सोनं 61,090 रुपये
दिल्ली - 22 कॅरेट सोनं 56,150 रुपये; 24 कॅरेट सोनं 61,240 रुपये
कोलकाता - 22 कॅरेट सोनं 56,000; 24 सोनं 61,090 रुपये
24 कॅरेट सोनं, 99.9 टक्के शुद्ध असतं. तर, 22 कॅरेट सोनं जवळपास 91 टक्के सोनं असतं. 22 कॅरेट सोन्यामध्ये 9 टक्के इतर धातू मिसळलेले असतात. ज्यामध्ये तांबं, चांदी आणि झिंक या धातूंचा समावेश आहे. 24 कॅरेट सोन्यालाच सर्वांची पसंती असते. पण, त्या सोन्यापासून दागिने तयार करता येत नाही. त्यामुळं अनेक पेढ्यांमध्ये 22 कॅरेट सोन्याचीच विक्री होते. थोडक्यात सोनं जितकं जास्त कॅरेटचं तितकं ते जास्त शुद्ध हे सोपं गणित कायम लक्षात ठेवा.
सोनं खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॉलमार्कचं चिन्हं. हॉलमार्कच्या चिन्हाद्वारे सरकारकडून सोन्याच्या शुद्धतीचे हमी दिली जाते. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (बीआईएस) हॉलमार्ककडून यासंदर्भातील हमी दिली जाते.