IndiGo ने 47 विमान सेवा केल्या रद्द

नागर विमानन महानिदेशालय म्हणजे डीजीसीएने प्रॅट अॅण्ड व्हिटनी इंजीनच्या 11 A-320 च्या विमानांच्या सेवा रद्द केल्या आहेत. 

Dakshata Thasale Updated: Mar 13, 2018, 12:35 PM IST
IndiGo ने 47 विमान सेवा केल्या रद्द  title=

मुंबई : नागर विमानन महानिदेशालय म्हणजे डीजीसीएने प्रॅट अॅण्ड व्हिटनी इंजीनच्या 11 A-320 च्या विमानांच्या सेवा रद्द केल्या आहेत. 

सोमवारी या सेवा रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे इंजिन विमानाच्या उड्डाणाच्यावेळी फेल झाल्याच समोर आलं आहे. यामधील 11 विमानांमधील 8 चे संचालन इंडिगो तर 3 चे संचालन गो एअर करत आहे. त्यामुळे डीजीसीएच्या निर्णयानंतर इंडिगो ने मंगळवारी आपल्या 47 विमानाचे उडाण रद्द केले आहेत. 

मोठ्या शहरांची विमाने केली रद्द 

इंडिगोने 47 डोमेस्टिक विमान सेवा रद्द करण्याची माहिती एअरलाईनच्या वेबसाइटवर अपलोड केली आहे. यमाध्ये मुंबई, दिल्ली, चैन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगलुरू, पटना, श्रीनगर, भुवनेश्वर, अमृतसर आणि गुवाहाटी या प्रमुख शहरांचा समावेश आहे. 

या घटनेच्या नंतर घेतला महत्वपूर्ण निर्णय 

डीजीसीएने इंडिगोच्या A-320 नियो विमानाच्या उड्डाणाच्यावेळी इंजिन फेल झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर तात्काळ विमान सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विमानाला एमर्जन्सीमध्ये अहमदाबाद विमानतळावर तात्काळ उतरवण्यात आलं. सोमवारी इंडिगोचं हे विमान उड्डाण घेताच काही मिनिटांत फेल झालं. या विमानात जवळपास 186 प्रवाशी प्रवास करत होते. हे विमान अहमदाबाद ते लखनऊ जात होतं. पहाटे 5.30 च्या सुमारास या विमानाला अहमदाबाद विमानतळावर उतरवण्यात आलं.