दीर आणि वहिनीच्या डान्सचा सर्वत्र धुमाकूळ... पाहाणारे पाहतचं राहिले

दीर आणि वहिनीच्या डान्सचा सर्वत्र धुमाकूळ,  व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर...   

Updated: Jun 13, 2022, 01:05 PM IST
दीर आणि वहिनीच्या डान्सचा सर्वत्र धुमाकूळ... पाहाणारे पाहतचं राहिले title=

मुंबई : सध्या सर्वत्र लग्न मोठ्या थाटात होताना दिसत आहे. लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद... हाच आनंद साजरा करण्यासाठी लग्न सोहळ्यात मोठ्या उत्साने मंडळी डान्स करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दीर आणि वहिनी जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, लग्न सोहळ्यामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. स्टेजवर डीजे आहे आणि सगळे नाचत आहेत. पण लग्न सोहळ्यात केंद्र स्थानी आहेत दीर आणि वहिनी. 

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, दीर आणि वहिनीच्या जोडीने डान्स फ्लोरवर तुफान डान्स केला. भर मंडपात वहिनी आणि दीराने धरलेला ठेका सध्या तुफान चर्चेत आहे. 

या दीर आणि वहिनीच्या (Devar Bhabhi Video) जोडीने असा काही ताल धरला की, तिथे उपस्थित सगळे लोकं या दोघांचाच डान्स पाहण्यात दंग झाले. सध्या दोघांना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.