Devar Bhabhi Video: दिराच्या लग्नात वहिनीचा डान्स जलवा, नववधू झाली थक्क

Devar Bhabhi Viral Dance Video : लग्न समारंभ म्हटलं की नटणं-मुरडणं आलं. लग्नाचा प्रसंग आला की, वहिनी आपल्या दिराच्या लग्नात वहिनी खूप धम्माल मस्ती करते. अशीवेळी वहिनी खास डान्सही सादर करते. असाच एक डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Updated: Dec 22, 2022, 12:58 PM IST
Devar Bhabhi Video: दिराच्या लग्नात वहिनीचा डान्स जलवा, नववधू झाली थक्क  title=

Devar Bhabhi Dance Viral Video: लग्न समारंभात धुमधडाका पाहायला मिळतो. कोणत्याही लग्नात नाच-गाणे (Wedding Dance) नसेल तर लग्न अपूर्ण वाटते. आजकाल लग्नात डान्सची  क्रेझ दिसून येत आहे. कधी नववधू नाचते तर कधी वधू-वर डान्स (Bride-Groom Dance) मस्ती करताना दिसतात. आता तर एका लग्नात दिराच्या लग्नात वहिनीने असा काही डान्स केला की तो सोशल मीडिायावर जोरदार व्हायरल होत आहे. या डान्सला तुफान प्रतिसाद मिळत आहे आणि कमेंट्सही पोस्ट करण्यात येत आहेत.

लग्नात केवळ कुटुंबीयच नाही तर  नातेवाईक आणि मित्रमंडळींही डान्स करताना पाहिले असेल. सर्व नातेसंबंधांमध्ये, सर्वात खास नाते म्हणजे दीर आणि वहिनी. आई-मुलाच्या नात्याप्रमाणे त्यांचे नाते दिसून आले आहे. त्यामुळे लग्नाचा प्रसंग आला की वहिनी आपल्या दिराच्या लग्नात खूप धम्माल-मस्ती करते.  दिराच्या लग्नात वहिनी सर्व जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेते आणि लग्नाच्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी होते. मात्र, लग्नात वहिनी आपला खास डान्स करायला विसरत नाही. असाच एक व्हिडिओ देखील इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वहिनी लग्नसमारंभ स्टेजवर जबरदस्त डान्स करत आहे.

दीर-वहिनीच्या व्हिडिओची जोरदार चर्चा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाच्या निमित्ताने वहिनी तिच्या दिरासमोर डान्स परफॉर्मन्स देत आहे. लग्नाच्या दिवशी 'हम आपके है कौन' या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटातील 'लो चली में, अपनी देवर की बारात लेके...' या गाण्यावर वहिनींनी ठेका धरला आहे. लग्नात वहिनी असा काही डान्स करते की पतीनेही तिच्यासोबत ठेका धरला आहे. यावेळी वहिनीचा डान्स पाहून नववधून थक्क झाली. वहिनीने पतीसोबत स्टेजवर जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिला. यावेळी समोर उपस्थित ढोलताशापथकाने जोरदार ढोल वाजवला. आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवर यूजर्सच्या अशा  प्रतिक्रिया  

इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर couple_official_page नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला 10 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओच्या वरील मजकूर असा आहे, 'सून लडकी के भाई. वहिनीने तिच्या डान्सने स्टेजला आग लावली आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि तरीही लोक त्यावर प्रतिक्रिया देण्यापासून मागे नाहीत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, 'मागील ढोलकी वाजवणारेही डान्स परफॉर्मन्स पाहून उत्साहित झाले.' दुसर्‍या युजरने लिहिले, 'उत्तम डान्स बघायला मिळाला.'