Desi Jugaad : एक AC आणि दोन खोल्या... मग तरुणानं असा लावला देसी जुगाड, पाहा फोटो

आता उन्हाळा सुरु झाला आहे. ज्यामुळे लोकांना उष्णतेची समस्या जाणवत आहे. त्यामुळे यापासून आराम मिळण्यासाठी बहुतेक घरात AC चा वापर केला जातो.

Updated: Apr 13, 2022, 10:21 PM IST
Desi Jugaad : एक AC आणि दोन खोल्या... मग तरुणानं असा लावला देसी जुगाड, पाहा फोटो title=

मुंबई : जुगाडामध्ये भारतीयांचा हात कोणीही पकडू शकत नाही. हे सगळ्यांनाच माहित आहेत. दरवाज्यापासून ते अगदी रोजच्या वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तुंचा भारतीयांकडे जुगाड असतो. सोशल मीडियावर आपल्याला असे जुगाड नेहमी पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. सध्या असाच एका जुगाडाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर लोक भरभरुन कमेंट्स देत आहेत.

आता उन्हाळा सुरु झाला आहे. ज्यामुळे लोकांना उष्णतेची समस्या जाणवत आहे. त्यामुळे यापासून आराम मिळण्यासाठी बहुतेक घरात AC चा वापर केला जातो. परंतु जर एका घरात एकापेक्षा जास्त खोल्या असतील आणि एकच AC असेल, तर मात्र लोकांना एकाच खोलीत AC लावल्याशिवाय पर्याय उरत नाही किंवा मग दोन वेगवेगळे AC घ्यावे लागतील.

परंतु या व्यक्तीनं आपल्या घरी AC वापरण्यासाठी असा काही जुगाड केला की, त्याने एकाच AC चा वापर करुन दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये त्याची हवा किंवा थंडावा पोहोचवला आहे.

खरं तर या व्यक्तीनं दोन खोल्यांमधील भिंतीच्या कोपऱ्यातील काही तोडून मधोमध AC ठेवला आहे. ज्यामुळे दोन्ही खोलीमधील लोकांना हा AC वापरणं सोयीचं झालं आहे. आता ही AC दोन्ही खोल्यांमध्ये मस्त हवा देईल आणि पैशांची बचत होईल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्यक्तीचा हा जुगाड पाहाण्यासारखा आहे. या जुगाडाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळे लोक या व्यक्तीच्या या युक्तीचं कौतुक करत आहेत.

घंटा नावाच्या अकाऊंटवरून हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.