नवी दिल्ली : स्वत:ला ईश्वराचा अवतार समजणारा बाबा राम रहीम तुरूगांत गेला आणि त्याच्या डेऱ्याची पोलखोल सुरू झाली. आजवर अनेकांसाठी केवळ आश्चर्य बणून राहिलेल्या या डेऱ्याचा न्यायलयाच्या देखरेखेखाली तपास सुरू आहे. या तपासातून अनेक सुरस गोष्टी बाहेर येत आहेत.
बाबाच्या सिरसा येथील मुख्य डेऱ्यातील तपास अद्यापही सुरूच आहे. दरम्यान, या तपासात चक्क नोटांनी भरलेल्या दोन खोल्या तपास अधिकाऱ्यांना मिळाल्या. पोलिसांनी या दोन्ही खोल्या सील केल्या आहेत. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा पाहून अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या डेऱ्याच्या तपासासाठी तब्बल ६ हजार जवान कार्यरत आहेत. डेऱ्याच्या इतर खोल्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर पैसा मिळाल्याचे समजते.
दरम्यान, बाबाच्या डेऱ्यात तपास अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोखड, प्लास्टिक मनी, कंम्प्यूटर, हार्ड डिस्क तसेच, इतर साहित्यही मिळाले आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटाही डेऱ्यात मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. विशेष असे की, डेऱ्य़मध्ये समांतर चलणव्यवस्थाही राबवली जात असे. याचा अर्थ असा की, डेऱ्यातील कोणतीही विस्तू तुम्हास खरेदी करायची असल्यास डेऱ्याचतीलच वेगळे चलन वापरावे लागायचे. जर एखाद्याकडे भारतीय करन्सीमधील पैसे असतील आणि सुट्ट्याचा प्रश्न निर्माण झाला तर, दुकानदार ते पैसे घेऊन त्याच्या मोबदल्यात ५ ते १० रूपयांची प्लास्टीक नाणी देत असे.