पोलिसांनी हुंकार रॅलीला परवानगी नाकारली, जिग्नेश मेवाणी रॅलीवर ठाम

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांची आज(मंगळवारी) दिल्लीत होणारी युवा हुंकार रॅली वादात सापडली आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या या रॅलीला परवानगी नाकारली आहे. तर रॅलीचे आयोजक आणि जिग्नेश रॅली करण्यावर ठाम आहेत. 

Updated: Jan 9, 2018, 11:12 AM IST
पोलिसांनी हुंकार रॅलीला परवानगी नाकारली, जिग्नेश मेवाणी रॅलीवर ठाम title=

नवी दिल्ली : गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांची आज(मंगळवारी) दिल्लीत होणारी युवा हुंकार रॅली वादात सापडली आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या या रॅलीला परवानगी नाकारली आहे. तर रॅलीचे आयोजक आणि जिग्नेश रॅली करण्यावर ठाम आहेत. 

युवा हुंकार रॅलीची घोषणा

दलितांवर होत असलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर २ फ्रेबुवारीला या युवा हुंकार रॅलीची घोषणा जिग्नेश मेवाणी यांनी केली होती. आयोजकांकडून आरोप करण्यात येत आहे की, ही रॅली दडपण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरीही ते रॅली करण्यावर ठाम आहेत. अशात काही गोंधळ होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

परवानगी नाकारली

सोमवरी रात्री दिल्ली डिसीपीकडून एक ट्विट करून सांगितले गेले की, एनजीटीच्या आदेशांना लक्षात घेता पार्लमेंट स्ट्रीटवर प्रस्तावित प्रदर्शनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ते हेही म्हणाले की, रॅलीच्या आयोजकांना लागोपाठ हा सल्ला दिला जातोय की, ही रॅली दुस-या कोणत्याही जागी आयोजित करा. पण ते नकार देत आहेत’.

डीसीपी ट्विटनंतर हा वाद चांगला पेटला आहे. रॅलीमध्ये सामिल डाव्यांनी दिल्ली पोलिसांविरोधात मोर्चा उघडला आहे. पोलिसांच्या ट्विटला उत्तर देत जेएनयू छात्रसंघाची उपाध्यक्ष राहिलेली शहला रशीदने म्हणाली की, रॅली तिथेच होईल.