Delhi Crime : फक्त 350 रुपयांसाठी तरुणाला 60 वेळा भोसकला चाकू; मृतदेहासमोर आरोपी नाचला, खळबळजनक Video समोर!

Delhi Crime Viral Video : तरुणावर चाकूने हल्ला केल्यानंतर आरोपीने त्याच्या मृतदेहासमोर डान्स (Killer Dance Near Dead Body) देखील केला. त्यामुळे आरोपी सायकोकिलर असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेवर आता पोलिसांनी माहिती दिली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Nov 25, 2023, 06:39 PM IST
Delhi Crime : फक्त 350 रुपयांसाठी तरुणाला 60 वेळा भोसकला चाकू; मृतदेहासमोर आरोपी नाचला, खळबळजनक Video समोर! title=
Delhi Crime News Killer Dance Near Dead Body

Killer Dance Near Dead Body : गेल्या काही दिवसांपासून भारतात अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीची प्रवृत्ती झपाट्यानं वाढत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतंय. दिल्लीच्या (Delhi Crime) कायदा आणि सुव्यवस्थेवर देखील गेल्या काही वर्षापासून सात्त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच आता दिल्लीमधून खळबळजनक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. एका अल्पवयीन आरोपीने एका तरुणाला तब्बल 60 वेळा चाकूने भोसकल्याचं समोर आलं आहे. त्याचा मृतदेहासमोर नाचतानाचा व्हिडीओ (Killer Dance Near Dead Body) देखील समोर आलाय. हा व्हिडीओ समोर आल्याने दिल्लीतच नाही तर देशभरात खळबळ उडाली आहे.

रस्त्यावर दरोडा टाकताना एका किशोरवयीन मुलावर चाकू हल्ला केल्याने दिल्ली पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला अल्पवयीन आरोपी मृतदेह एका अरुंद गल्लीत ओढतांना दिसत आहे. आरोपीने लुटण्याच्या उद्देशाने तरुणावर वार केला. त्यावेळी त्याची जागीच हत्या झाली. मात्र, मृत्यू निश्चित करण्यासाठी त्याने तरुणावर तब्बल 60 वेळा चाकूने (Stabbed 60 times) वार केला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आरोपी तरुणाच्या मानेवर वारंवार वार करताना दिसतोय. तसेच हल्लेखोर पीडितेच्या डोक्यावर अनेक वेळा लाथ मारताना देखील दिसतोय. एवढंच नाही तर आरोपीने त्यानंतर जे काही केलं त्यावर विश्वास देखील बसणार नाही.

तरुणावर चाकूने हल्ला केल्यानंतर आरोपीने त्याच्या मृतदेहासमोर डान्स देखील केला. त्यामुळे आरोपी सायकोकिलर असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेवर आता पोलिसांनी माहिती दिली आहे. घटनेच्या तपासादरम्यान, अल्पवयीन मुलाला पकडण्यात आलं आणि त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. हत्येमागील हेतू दरोडा आहे. मुलाने प्रथम पीडितेचा गळा दाबला आणि जेव्हा तो बेशुद्ध झाला, तेव्हा आरोपींनी त्याच्याकडे सुमारे 350 रुपये लुटण्यापूर्वी त्याच्यावर अनेक वेळा वार केले. पीडित व्यक्तीला जीटीबी रुग्णालयात नेण्यात आलं जेथं त्याला मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती डीएसपीनी सांगितली आहे.

पाहा Video

दरम्यान, देशभरात दरवर्षी अल्पवयीन मुलांवर 30 हजार गुन्हे दाखल होतात. 35 हजारांहून अधिक अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 10 पैकी 9 अल्पवयीन दोषी सिद्ध झाले आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ही केंद्र सरकारची एजन्सी गुन्ह्यांच्या नोंदी ठेवते. अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीची आकडेवारी आश्चर्यकारक असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.