नवी दिल्ली : जहांगीरपुरीच्या गारबेज डंपिंग स्थळच्या जवळ पाच अल्पवयीन मुलांनी 20 वर्षीय तरूणीवर गँगरेप केला आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. गंभीर बाब ही आहे की या प्रकरणातील सर्व दोषी हे अल्पवयी आहे. गुरूवारी दुपारी पीडित तरूणीने जहांगीरपुरी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, पीडित मुलीने दिलेल्या जबाबामध्ये 10 वाजता सर्व आरोपी तिला जबरदस्तीने एमसीडी अपार्टमेंटच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागी घेऊन गेले. जिथे त्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. तिला धमकी देण्यात आली की, जर ती ओरडली किंवा या प्रसंगाची कुणाला माहिती दिली तर तिला मारण्यात येईल.
गुरूवारी, या पीडित तरूणीने आपल्या एका नातेवाईकाला हा घडलेला प्रकार सांगितला. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देण्यात आली. तिची मेडिकल तपासणी करण्यात आली. यानंतर गँगरेपचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी सीआपीसीच्या 164 व्या नियमानुसार मजिस्ट्रेटच्या समोर तिचं स्टेटमेंट घेण्यात आलं. एक एनजीओ या प्रकरणात त्या मुलीची काऊसिलिंग करत आहे.