संरक्षणमंत्री राजनाथ सिंह १० वाजता करतील महत्त्वपूर्ण घोषणा, संरक्षण मंत्रालयाची माहिती

संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाने ट्विट करून याबाबत दिली माहिती़.

Updated: Aug 9, 2020, 09:49 AM IST
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह १० वाजता करतील महत्त्वपूर्ण घोषणा, संरक्षण मंत्रालयाची माहिती title=

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज दहा वाजता महत्त्वपूर्ण घोषणा करतील. संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाने रविवारी सकाळी ट्विट करून याबाबत माहिती दिली. लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेखा (एलएसी) वर चीनबरोबर तणाव निर्माण झालेले असताना काय घोषणा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मंत्रालयाने ट्विट केले की, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सकाळी दहा वाजता महत्त्वपूर्ण घोषणा करतील.' या क्षणी, अशी शक्यता वर्तवली जात आहे की संरक्षण मंत्री चीनकडून आयातीसंदर्भात घोषणा करू शकतात.'

संरक्षण मंत्रालय लवकरच नेगेटिव आर्म्स लिस्ट आणणार आहे. त्याअंतर्गत ठराविक शस्त्रे आयात करण्यावर बंदी घातली जाईल.