राजनाथ सिंह दोन दिवसांच्या लडाख, जम्मू काश्मीर दौऱ्यावर

दोन दिवस करणार पाहणी 

Updated: Jul 17, 2020, 08:12 AM IST
राजनाथ सिंह दोन दिवसांच्या लडाख, जम्मू काश्मीर दौऱ्यावर  title=

मुंबई : चीनसोबत बॉर्डरवर सुरू असलेल्या तणावामुळे आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC) परिसराचा दौरा करणार आहे. संरक्षण मंत्री दोन दिवसाच्या दौऱ्यावर जम्मू काश्मीर आणि लडाखला जाणार आहे. येथे राजनाथ सिंह LAC सोबतच LoC देखील जाणार आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज १७ जुलै रोजी लेहला पोहचणार. तेथून ते LoC ला जाणार आहेत. जेथे जावून पाकिस्तानच्या बॉर्डरची पाहणी करणार आहेत. यानंतर १८ जुलै रोजी राजनाथ सिंह LAC येथे जाणार आहे. जेथे चीन बॉर्डरची पाहणी करतील. 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या अगोदर दिल्लीत सेना प्रमुख, चीफ ऑफ डिफेंस स्टाफसोबत बैठक करून बॉर्डरवर असलेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. १५ जून रोजी २० जवान शहीद झाल्यानंतर सीमेवर तणावाचं वातावारण आहे.