Twitter Trending: कोण आहे 'ही' नेहा आणि का होतेय ट्विटरवर ट्रेंड, जाणून घ्या

Twitter : त्यामुळे कोण आहे ही नेहा आणि ती ट्विटरवर (Twitter) का ट्रेंड (Trend) करते आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सोशल मीडियावर अनेक लोक आपल्या भावना आपले विचार मांडतात.

Updated: Oct 14, 2022, 11:18 AM IST
Twitter Trending: कोण आहे 'ही' नेहा आणि का होतेय ट्विटरवर ट्रेंड, जाणून घ्या title=
dear neha trending on twitter nmp

Dear Neha Trending on Twitter : जर तुमचं नाव नेहा असेल, किंवा तुमच्या ओळखीपैकी कोणाचं नाव नेहा असेल तर ही बातमी नक्की वाचा. सध्या सोशल मीडिया (Social media) प्लेटफॉर्म ट्विटरवर 'Dear Neha' ट्रेंड होते आहे. त्यामुळे कोण आहे ही नेहा आणि ती ट्विटरवर (Twitter) का ट्रेंड (Trend) करते आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सोशल मीडियावर अनेक लोक आपल्या भावना आपले विचार मांडतात. त्यानंतर ते विचार किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता किंवा ट्रेंड होतात. 

तसंच काहीस या नेहासोबत झालं आहे. तिने ट्विटरवर करवा चौथबद्दल (Karwa Chauth) आपले मत मांडलं आणि त्यानंतर ती टेंड्र होते आहे. गुरुवारी देशभरात मोठ्या उत्साहात करवाचौथ साजरा करण्यात आला. करवा चौथ हा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी महिला दिवसभर उपाशी राहतात. रात्री चंद्र दिसल्यावर त्या पतीच्या हाताने पाणी पिऊन आपल्या उपवास सोडतात. गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर भारतात (North Indian) ही परंपरा निभवली जाते आहे. (dear neha trending on twitter nmp) 

हे ही वाचा - Aamir Khan:आमिर खान पुन्हा नेटकऱ्यांचा निशाण्यावर, विवेक अग्निहोत्रीची वादात उडी

'करवाचौथ करुन आयुष्य वाढत नाही...'

पण आधुनिक युगात आज महिला या व्रत आणि करवाचौथ या सगळ्यावर विश्वास ठेवतं नाही. करीना कपूरनेही (Kareena Kapoor) एका मुलाखतीत म्हटलं होतं की, प्रेम सिद्ध करण्यासाठी मला करवाचौथचा उपवास करायची गरज नाही. तसंच नेहा हिने उत्तर भारतीय महिलांना उद्देशून एक ट्वीट केलं. त्यात ती म्हणते की, कुठल्याही पुरुषसाठी उपवाशी राहण्याची त्यांची लायकी नाही. एक दिवसाच्या उपवासाने कोणाचंही आयुष्य वाढू शकत नाही. उपाशी राहिल्यामुळे कोणाचं काही चांगलं होतं नाही, अशा शब्दात तिने आपल्या भावना मांडल्या आणि त्यानंतर ती ट्विटरवर ट्रोल होते आहे. 

कोण आहे ही नेहा ?

नेहा हिच्या या ट्वीटरवर इतर यूजर्स  Dear Neha  नावाने तिला खरीखोटी ऐकवतं आहे. अनेकांनी तिला परंपराची तर काहींनी तिला भारतीय असल्याची आठवण करू दिली. नेहा दीक्षित (Neha Dixit) असं या महिलेचे नाव असून ती एक पत्रकार  (Journalist) आहे.

नेहा यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी नेहा यांनी असं एकच वादग्रस्त ट्वीट केलं होतं त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.