Dawood Ibrahim planning to create riot : आताची सर्वात मोठी बातमी...दाऊद इब्राहिम पाकिस्तानात बसून भारताविरोधात कट रचतोय. पाकिस्तान (Pakistan), अंडरवर्ल्ड माफिया आणि दहशतवाद्यांच्या (terrorist) सातत्याने भारताविरोधी (India) कारवाया सुरुच असतात. 26/11 च्या आठवणी अजूनही ताज्या असताना हा मोठा खुलासा झाला आहे.
दाऊद इब्राहिम पाकिस्तानात बसून भारतात दंगली घडवण्याचा कट रचत असून त्याने दंगल सेल स्थापन केला आहे. दाऊदचे टार्गेट दिल्ली, मुंबई आणि देशातील मोठी शहरे आणि बडे राजकारणी असल्याचे एनआयएच्या आरोपपत्रात उघड झाले आहे.
दरम्यान दहशतवादी (terrorist) आणि अंडरवर्ल्ड माफियांच्या मदतीने भारतातील तरुणांना ड्रग्जच्या माध्यमांतून पोकळ करण्याचा कट पाकिस्तान रचत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. देशातील अमली पदार्थांच्या तस्करीच्या वाढत्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या विविध यंत्रणांनी (NCB) याबाबत मोठा खुलासा केला आहे.
दाऊदने स्थापन केलेल्या दंगल सेलचे नेतृत्व कोण करत आहे? खरं तर, एका टेरर फंडिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीदरम्यान एनआयएला ही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. एनआयएने टेरर फंडिंग प्रकरणात आरिफ शेख आणि शब्बीर शेख नावाच्या दोन आरोपींना अटक केली होती. या दोन्ही आरोपींनी 25 लाखांची रक्कम पाकिस्तानातून दुबईमार्गे मुंबईला पाठवली होती आणि ही रक्कम छोटा शकीलच्या माध्यमातून दोघांनाही पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे.