केरळ : केरळमधील कोचीत आलेल्या पुरानंतर पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी देशभरातून नागरिक पुढे आले. विदेशातूनही केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्यात आला. अनेक सेलिब्रेटींनीही पुढाकार घेत लाखोंची मदत केली. पण काही अशाही व्यक्ती होत्या ज्यांना प्रसिद्धीमध्ये न येता सेवा करण्यातच सुखं होतं.शिवरीतील दादरा नगर हवेलीतील कलेक्टर सलग आठ दिवस आपली ओळख लपवून या कार्यात सहभागी होते.
या दरम्यान त्यांनी आपल्या डोक्यावर वजन घ्यावं लागलं, साफसफाई, मुलांना कडेवर घेऊन भरवणं अशी सारी कामं त्यांनी मनापासून केली. पण नवव्या दिवशी त्यांची ओळख समोर आलीच. त्यानंतर कोणालाही न सांगता ते शिविरला परतले.
2012 बॅचचे आयईएस कानन गोपीनाथ सध्या दादरा नगर हवेली येथे जिल्हा कलेक्टर म्हणून कार्य करत आहेत. 26 ऑगस्टला कोचीत आलेल्या पूरानंतर ते शिविरला पोहोचले होते. त्यांनी आपली ओळख लपवत सेवा सुरू ठेवली. दादरा नगर हवेलीतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधिला 1 कोटी रुपयांचा चेक देण्यासाठी ते गेले होते.
चेक दिल्यानंतर या 32 वर्षीय अधिकाऱ्याने तिरुअनंतपुरम येथून बस पकडली खरी पण ती घरी येण्यासाठी नाही तर केरळला जाण्यासाठी होती. वेगवेगळ्या रिलीफ कॅम्पमध्ये ते मदतकार्य पोहोचवत होते. आपण कलेक्टर असल्याचे त्यांनी या दरम्यान कोणालाच सांगितले नाही.
आपण काही खूप ग्रेट काम केलं नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी ओळख उघड झाल्यानंतर दिली. पूरजन्य परिस्थितीत जाऊन लोकांना सुरक्षित बाहेर काढणारे खरे हिरो आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. ओळख पटल्यानंतर लोकांनी मला हिरो बनवलं आणि माझ्यासोबत सेल्फी काढले याचे दु:ख झाल्याचेही ते सांगतात.