मुंबई : डी मार्ट (D-Mart) रिटेल चेन चालवणारी कंपनी एवेन्यू सुपरमार्ट्स (Avenue Supermarts)चे प्रमोटर आणि मालक राधाकिशन दमानी हे (Radhakishan Damani)जगातील टॉप 100 सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत सहभागी झाले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) अनुसार, दमानी जगातील 100 श्रीमंतांच्या यादीत 97 व्या क्रमांकावर आहेत. ज्यांची एकूण संपत्ती 1.43 लाख करोड रुपये आहे. गेल्या 18 महिन्यात एकूण संपत्ती 1 मार्च 2020 ला 12 अरब डॉलरहून 60 टक्के वाढली असून आता ती 19.3 अरब डॉलर झाली आहे.
एवेन्यू सुपरमार्ट्स (Avenue Supermarts)च्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 61%वाढ झाली आहे. कोविड-19 महामारीच्या काळात कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. D-Mart कंपनीला एवेन्यू सुपरमार्टस लिमिटेडने संचालित केलं आहे. कंपनीला 115.13 करोड नेट प्रॉफिट झालं आहे. सोबतच रेव्हेन्यूमध्ये देखील 31 टक्के वाढ झाली आहे.
दमानी यांनी मुंबईतील मालाबार हिल परिसरात 5752.22 वर्ग मीटरचे आलीशान घर खरेदी केलं आहे. त्यांनी ही प्रॉपर्टी 1001 करोड रुपयांना खरेदी केली आहे. Avenue Supermarts मध्ये दमानी आणि प्रमोटर ग्रुपची 74.90 टक्के हिस्सेदारी आहे. दमानी यांचं इतर कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूक आहे. इंडिया सीमेंट्स (India Cements)मध्ये त्यांची 11.3 टक्के, वीएसटी इंडस्ट्रीज (VST Industries) मध्ये 26 टक्के, सुंदरम फाइनेंस (Sundaram Finance) मध्ये 2.4 टक्के गुंतवणूक केली आहे.
मीडिया आणि चर्चेपासून कायमच दूर असलेल्या डी-मार्टचे मालक राधाकिशन दमानी यांना 'मिस्टर व्हाइट ऍण्ड व्हाइट' असे देखील संबोधले जाते. ते अनेकदा सफेद शर्ट आणि सफेट पँट घालतात. सुरूवातीच्या काळात बॉल-बिअरिंगच्या दुकानावर काम करताना त्यांना फायदा झाला नाही. मारवाडी कुटुंबियातून येणारे दमानी वडिलांच्या निधनानंतर स्टॉक बाजारात गुंतवणूक करू लागले.
दमानी यांनी 90 च्या दशकात शेअर बाजारात कोट्यावधींची गुंतवणूक केली होती. पुढल्यावर्षी दमानी यांची संपत्ती एवढी वाढली की, मुकेश अंबानींच्यानंतर भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे दमानी यांनी 2002 साली रिटेल मार्केटची घोषणा केली. मुंबईत आपलं पहिले रिटेल स्टोर सुरू केलं. त्यानंतर दमानी यांचा रिटेल मार्केटचा व्यवसाय तेजीत सुरू झाला.
रिटेल मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या दमानी यांचा निर्णय योग्य ठरला. मार्च 2017 मध्ये D-Mart चे आयपीओ देखील लाँच करण्यात आले. हा आयपीओ D-Mart ची पॅरेंट कंपनी ‘एवेन्यू सुपरमार्ट्स’ लाँच केले होते. 299 रुपये प्रति शेअर ऑफर करणाऱ्या या कंपनीचा स्टॉक्स 604 रुपयांपर्यंत पोहोचले. बुधवारी ‘एवेन्यू सुपरमार्ट्स’चे शेअर 3651.55 रुपयांपर्यंत पोहोचले.