What is cryptocurrency: गेल्या तीन एक वर्षांपासून क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) म्हणजे कूटचलन या नव्या प्रकाराच्या ऑनलाईन करन्सीमध्ये (online currency) गुंतवणूक आणि ट्रेडिंग (trading) करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. जगभरात या करन्सीचा भावही वधारतो आहे. श्रीमंत लोकं या नव्या करन्सीमध्ये पैसे लावत आहेत. क्रिप्टोकरन्सी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते बीटकॉईन (bitcoin). असं म्हणतात की या करन्सीतून म्हणजेच बीटकॉईनमधून आपण करोडो रूपये व्हर्च्यूअली राखून ठेवू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून आणि विशेषत: कोविड काळात जेव्हा यावरील संशोधन वाढू लागले आणि लोकांना, गुंतवणूकदारांना (investors) या नव्या व्हर्च्यूअल करन्सीचे (virtual currency) महत्त्व पटू लागले तेव्हापासून या भविष्यवेधी करन्सीकडे लोकं आशेने पाहू लागले आहेत. चला तर मग जाणून घेऊया की या नव्या दमाच्या चलनामुळे वाढलेली तेजी काय आहे? बिटकॉईन म्हणजेच क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? आणि त्याचं ट्रेडिंग (bitcoin trading) नक्की कसं होतं? (cryptocurrency update what is bitcoin and how its trading happens virtual currency)
सर्वप्रथम जाणून घेऊया की भारताच्या दृष्टीनं क्रिप्टोकरन्सीचं (cryptocurrency importance) महत्त्व काय? रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं (RBI on cryptocurrency) या करन्सीवर शंका उपस्थिक केली होती. त्यामुळे ही करन्सी सुरक्षित किती म्हणण्यापेक्षा या करन्सीचं भविष्य भारतात कसं असेल; असा मुद्दा उपस्थित झाला होता. आरबीआयचं असं म्हणणं होतं की त्यांच्याकडे क्रिप्टोकरन्सीचा कसलाच डेटा नाही त्यामुळे भविष्यात या करन्सीचं ट्रेडिंगही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन (digital currency) आहे. हे व्हर्च्यूअल फॉर्ममध्ये दिसते. याचे रूप काही नोटांसारखे नसते किंवा नाण्यांसारखे नसते, परंतु याद्वारे तुम्ही वस्तू खरेदी करू शकता. दोन-तीन वर्षांपुर्वी या बिटकॉईनचा भाव एक-तीन हजार रूपयांपासून होता आता तो 16-20 लाखांच्या वर किंवा आसपास पोहचला आहे. डॉलर्सच्या भाषेत सांगयाचे झाले तर वीस-बावीस हजार डॉलर्स अशी त्यांची किंमत होते. हे बाजारात खरेदी - विक्री करण्यासाठी शेअर मार्केटप्रमाणे याचे ट्रेडिंग कसं होतं याकडे लक्ष द्यावे लागते.
2020 पासून भारतातही क्रिप्टोकरन्सीचा वेग वाढू लागला आहे. याचा दीर्घकालीन परिणाम किती आणि कसा आहे याची अद्यापही शाश्वती देता येईलच असे नाही परंतु अनेक तज्ञांच्या मते, या कॉईनमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.
बिटकॉईनचं ट्रेडिंग हे सध्या सर्वांसाठीच नवीन आहे त्यामुळे तुम्ही टेडिंग कसं कराल याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागते. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग तज्ञांची मदत घेऊ शकता. सध्या अनेक जण बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवत आहेत आणि चांगली कमाईही करत आहेत. तुम्ही सोप्प्या मार्गानंही या बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करू शकता त्यासाठी तुम्हाला त्याच्या ट्रेडिंगकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक डिजिटल वॉलेट तयार करावे लागते. त्यानंतर एकाच वेळी या बिटकॉईनची किंमत जगात वाढते परंतु कोणीही यावर आपल्या हिशोबानं ट्रेडिंग कंट्रोल करत नाही यासाठी तशी स्वतंत्र डिजिटल यंत्रणा असते. त्यामुळे अशा ट्रेडिंगचा भाव खरेदी-विक्रीनुसार वाढतो.