Advantages & Disadvantages of Cryptocurrency in Marathi: सध्या क्रिप्टोकरन्सीचं ( cryptocurrency) वेड बाजारात वाढू लागलं आहे. हे एक प्रकारचे आभासी म्हणजेच डिजिटल चलन ( digital chalan ) आहे. यातून एक वॉलेट तयार केले जाते आणि त्या वॉलेटवरून आपण क्रिप्टो करन्सीचं ( Cryptocurrency Trading) ट्रेडिंग करू शकतो. आता पुढचे भविष्य हे कॅशलेस (cashless) स्वरूपाचं असण्याची शक्यता आहे कारण ज्याप्रमाणे आता डिजिटल क्रांती होऊ लागली आहे त्यानूसार यापुढचे भविष्य हे अधिक डिजिटलायझेशनकडे (digitalization) वळणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. आपण आता सर्वच जण जीपे, पीटेएम (paytm) वापरतो आहोतच. त्यानूसार आता यात क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन, ब्लॉकचेन (blockchain) यांची हळूहळू चलती वाढू लागली आहे. हे आभासी चलन आता येत्या काळात अधिराज्य घालणार आहे. (cryptocurrency news these are the prons and cons of cryptocurrency know more)
असं असलं तरी या नव्या दमाच्या आभासी चलनाचे फायदे (pros and cons) भरपुर असले तरी त्याचे तोटेही अनेक आहेत फक्त फायदेच नाहीत तर या चलनाचे तोटेही अनेक आहेत. तेव्हा जाणून घेऊया की नव्याने लोकप्रिय होणाऱ्या या चलनाचे फायदे आणि तोटे काय आहेत? भारतातही हे चलन अगदी गतीशील पद्धतीनं वाढू लागलं आहे. त्यामुळे याद्वारे जेव्हा आपण व्यवहार करू तेव्हा त्यातील चांगले आणि वाईट परिणाम आपल्याला समजून घ्यावे लागणार आहेत. आजकाल काही लोक इलेक्ट्रॉनिक पैशांद्वारे व्यवहार करतात ही वस्तुस्थिती आहे. क्रिप्टोकरन्सी दीर्घकालीन (long term chalan) चलने असू शकते पण जगभरातील नियामकांकडून तीव्र विरोध लक्षात घेता मुख्य प्रवाहाच्या या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी त्यांची गती मंद होऊ शकते.
हेही वाचा - व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे पोलिसांच्या 'जाळ्यात', तब्बल इतक्या कोटींचा माल जप्त
बिटकॉइन चलनाचा (disadvantage of bitcoin) सर्वात मोठा तोटा हा आहे की जर तुमचा संगणक हॅक झाला असेल तर तो परत केला जाणार नाही, म्हणजेच तो परत मिळणार नाही. एवढेच नाही तर त्याच्या चोरीबद्दल तुम्ही पोलिसात किंवा कुठेही तक्रार नोंदवू शकत नाही.
1. असं म्हटलं जातं की क्रिप्टोद्वारे महागाईवर नियंत्रण येते त्याचसोबतच हे सुरक्षित आणि खाजगी आहे.
2. त्याचसोबतच क्रिप्टोकरन्सीचं एक्सचेंज स्वरूप खूप सुरक्षित आहे. त्याचसोबतच याचा व्यवहार हा किफायतेशीर आहे.
3. बिटकॉइन व्यवहारांसाठी खातेवही तयार केले जाते. जगातील लाखो व्यापारीही बिटकॉइनने व्यवहार करतात. मात्र अद्याप कोणत्याही मध्यवर्ती बँकेने (reserve bank) त्याला मान्यता दिलेली नाही. अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्याही बिटकॉइन स्वीकारतात. इंटरनेटच्या जगात अनेक एक्सचेंज आहेत जे ते खरेदी आणि विक्रीसाठी उपलब्ध करतात. इंटरनेटवरील अनेक वेबसाइट्स आणि अॅप्सद्वारे त्याची खरेदी आणि विक्री केली जाते. यामध्ये खरेदी-विक्री करणाऱ्यांची माहिती लपवली जाते.
4. या करन्सीद्वारे फंड लवकर ट्रान्सफर होतात असं म्हटलं जातं.