ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले त्याच मुलाच्या हत्येची सुपारी? का आली आई-वडिलांवर ही वेळ?

parents killed son : आई-वडिलांनी इतकं धक्कादायक पाऊल का बरं उचललं?

Updated: Nov 2, 2022, 07:16 PM IST
ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले त्याच मुलाच्या हत्येची सुपारी? का आली आई-वडिलांवर ही वेळ? title=

Crime news : आई-वडील झाल्यानंतरचा आनंद वेगळाच असतो. मुलाचे लाड केले जातात. त्याला हव्या त्या गोष्टी आणून दिल्या जातात. त्याला कधीही कसलीही कमतरता भासू नये म्हणून आई-वडील आयुष्यभर कष्ट करतात. पण ज्या मुलासाठी इतकं करतो त्याच मुलाच्या हत्येची सुपारी कोण कशी काय देऊ शकतं.? ऐकून तुम्हाला ही धक्का बसला ना? पण ही खरी घटना आहे. ज्या वयात आपली मुलं आपला सांभाळ करतील अशी पालकांची इच्छा असते. त्याच वयात त्यांनी आपल्याच 26 वर्षाच्या मुलाच्या हत्येची सुपारी दिली. असं काय घडलं की, आई-वडिलांनी असं पाऊल उचललं असेल.? (Crime news in marathi)

कलियुगात काहीही होऊ शकतं असं म्हणतात. सरकारी शाळेत मुख्यध्यापक असलेले क्षत्रिय राम आणि त्यांची पत्नी राणीबाई यांनी हे धक्कादायक पाऊल का बरं उचललं असेल. मुलाने इतका त्रास दिला की. त्यांनी त्याला मारण्याचा निर्णय घेतला. तेलंगणाच्या खम्मममधून ही घटना समोर आली आहे. मुलगा दारु पिण्यासाठी पैसे मागत असे. पण पैसे न दिल्यास तो आपल्या आई-वडिलांना मारत असे. त्याचं व्यसन सोडवण्यासाठी पालकांनी अनेक प्रयत्न केले. पण तो सुधरत नव्हता. त्याची बहिण अमेरिकेत आहे. पण आई-वडील इतकं धक्कादायक पाऊल उचलतील असं कोणालाच वाटलं नव्हतं.

देशात वृद्ध आई-वडिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. National Crime Records Bureau च्या 2021 च्या अहवालानुसार देशातील अनेक राज्यात या घटना वाढत आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात या घटना अधिक आहेत. तमिलनाडु, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये वृद्धांच्या हत्येचे प्रकरण अधिक नोंदवले गेले आहेत. देशात 14 कोटीहून अधिक वृद्ध व्यक्ती आहेत.