एका चप्पलेमुळं उलगडले हत्येचे गूढ; आरोपीला पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला

Crime News Today: मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन मित्राचा खून करुन पेट्रोल टाकून जाळण्यात आले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 15, 2023, 12:30 PM IST
एका चप्पलेमुळं उलगडले हत्येचे गूढ; आरोपीला पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला title=
crime news today man killed friend for money and burnt deadbody

Crime News In Marathi: मित्रासोबत दारू प्यायला एकत्र बसला दोघ मित्रांनी विविध विषयांवर गप्पा मारला त्यानंतर असं काही घडलं की एकाने दुसऱ्या मित्राची दारूच्या नशेत हत्या केली. आरोपी मित्राने डोक्यात विट घालून आपल्याच मित्राची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळून टाकला आणि घटनास्थळावरुन फरार झाला. मात्र, एका चपलेमुळं आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या घटनेने एखच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे ही घटना घडली आहे. 

पोलिसांना एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर अर्धवट जळालेल्या स्थितीत मृतदेह सापडला होता. जळालेल्या स्थितीत असल्यामुळं मृतदेहाची ओळख पटवणे मोठे आव्हान ठरले होते. मात्र हत्याकांडाच्या जवळच मयत व्यक्तीचे चप्पल पडले होते. त्यामुळं या सर्व प्रकाराचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून लूटीच्या उद्देशाने हा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी असं मयत तरुणाचे नाव असून तो सकाळी बँकेत 1 लाख रुपये जमा करण्याच्या उद्देशाने गेला होता.मात्र संध्याकाळ झाली तरी तो घरी परतला नव्हता. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी गावाच्या लगतच त्याची बाइक सापडली होती. काही तरी बरे-वाइट झाले असेल या शंकेने त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मध्यरात्री बिजनौर परिसरात सनीचे अर्धवट जळालेल्या स्थितीत मतदेह सापडला. पोलिसांनी याबाबत घरच्यांना माहिती देताच त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी त्याचा मित्र दुर्गेशसह 9 ऑगस्ट रोजी घराबाहेर पडला होता. दोघंही पूर्ण दिवस एकत्रच होते. त्याचवेळी सनीने मोबाइल खरेदी केला आणि दोघही एका ढाब्यावर जेवायला बसले होते. त्याचवेळी दुर्गेशची नजर सनीकडे असलेल्या पैशांवर गेली. हे पैसे लुटण्याच्या इराद्याने दुर्गेशने सनीची हत्या केली. 

मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी त्याने जवळच असलेल्या बाइकचे पेट्रोल काढून मृतदेहावर टाकून जाळले आणि पैसे घेऊन फरार झाला.पोलिसांनी घटनास्थळावर सापडलेल्या चप्पलांवरुन सनीच्या मृतदेहाची ओळख पटली आणि त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.