लव से*स और धोका! डोक्यात संशयाचं खुळ...अन् पोरीनं असा केला Love Story चा अंत

Crime News of Love : मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, असं तो वारंवार सांगायचा. दोघांच्या घरच्यांची ओळख देखील झाली. झालं असं की, तरुणाने आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला अन्...

Updated: Nov 14, 2022, 11:41 PM IST
लव से*स और धोका! डोक्यात संशयाचं खुळ...अन् पोरीनं असा केला Love Story चा अंत title=
Crime News of Love

Crime News: एका गावात राहणाऱ्या तरुणीचे त्याच गावात राहणाऱ्या तरुणासोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध (love affair) सुरू होते. दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, असं तो वारंवार सांगायचा. दोघांच्या घरच्यांची ओळख देखील झाली. मुलीच्या कुटुंबीयांनी किंवा तरुणाच्या कुटुंबीयांनीही दोघांच्या प्रेमविवाहाला (Love Marriage) आक्षेप घेतला नाही. (Crime News of Love sec Dhoka affair of girlfriend boyfriend Marriage)

नेमकं काय घडलं?

दोघांचं अफेअर सुरू असताना तरुणी बराच वेळ फोनवर बोलत असायची. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडणं देखील झाली. तरुणाच्या डोक्यात संशयाचं खुळ वाढत गेलं. आपली प्रेयसी आता दुसऱ्याची झाली, असा त्यावर त्याचा विश्वास निर्माण झाला. त्यामुळे तो प्रेयसीकडे दुर्लक्ष करू लागला. याठिकाणी तरूण दुसऱ्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्याचा संशयही तरुणीला आला. या गैरसमजामुळे दोघांमधील अंतर वाढत गेले.

तरुणाने आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला, परंतु तरुणीने आपल्या प्रियकराला इतर कोणाचेही होऊ देणार नाही, अशी शपथ घेतली. मुलीच्या सांगण्यावरून नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांची पंचायत बसली, मात्र प्रकरण काही निष्पन्न झालं नाही. त्यावर मुलीने संपूर्ण घटना लेडी इन्स्पेक्टरला (Lady Inspector) यांना सांगितली.

पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला. प्रियकराशी लग्न न केल्यास आत्महत्या करेन, असं तरुणीने सांगितलं होतं. त्यावर कारवाई करणाऱ्या महिला निरीक्षकाने तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांना बोलावलं. मुलीलाही बोलावलं. त्यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. 

आणखी वाचा - Crime: 4 वर्षांनंतर असा झाला हत्येचा खुलासा जेव्हा पत्नी आणि शेजाऱ्याला झाली अटक

दरम्यान, दोन्ही कुटुंबीयांमध्ये जोरदार राडा झाला. आख्ख्या गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली. यानंतर तरुणानं प्रेयसीसोबत कोर्ट मॅरेज (Court marriage) करण्यास होकार दिला. शुक्रवारी दोघांनी कोर्टात लग्न केलं. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला आहे.