Crime News Today: उत्तर प्रदेशच्या झांसी येथील सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. चालक्या कारमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर पोलिस अधिकाऱ्याचे एक वक्तव्य संताप निर्माण करणारे आहे. पिडीतेवर अत्याचारानंतर पोलिसाने पीडितेच्या वडिलांसोबतच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कोलकत्ता येथे डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली तर बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या दोन घटनांनी देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली होती. त्यामुळं हे प्रकरण अधिकच चिघळले आहे. त्याचबरोबर आता झांसी येथेही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीबरोबर तिन जणांनी अतिप्रसंग केला आहे. तरुणीला धमकी देत तिचा रस्त्यावरच सोडण्यात आले.
झांसीच्या काशीनगर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तीन जणांची चालत्या कारमध्ये बलात्कार केला. त्यानंतर तिघांनी तिला धमकी देऊन मंदिराच्या जवळ सोडले. या घटनेनंतर धक्का बसलेली ती रडत विव्हळत तिच्या आत्याच्या घरी पोहोचली. तिथे तिने तिच्यासोबत जे घडलं त्याबद्दल सांगितलं. नंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
जेव्हा तरुणी घरातून प्रातःविधीसाठी बाहेर पडली तेव्हा गावात राहणाऱ्या तीन जणांनी तिला जबरदस्ती कारमध्ये बसवलं आणि तिच्यावर अत्याचार केला. जेव्हा तिची प्रकृती बिघडली तेव्हा तिला करौंदी माता मंदिरात सोडून दिलं आणि पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्यानंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मुलगी घराबाहेर निघाली तेव्हा रस्त्यात तीन जणांनी तिला गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलीच्या आत्येभावाने पोलिसांत तक्रार दाखल केली. तेव्हा पोलीस ठाण्याचे प्रभारी मुलीच्या वडिलांकडे आले आणि म्हणाले, तुला मुलीला सांभाळता येत नाही का? तु बघत नाहीस का मुलगी कुठे जातेय आणि काय करतेय. इतकं बोलून ते निघून गेले, असं आरोप पीडीतेच्या कुटुंबीयांनी केलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पीडीतेची वैद्यकीय चाचणी करुन तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.