फेसबूकवर मैत्री, मग प्रेम... तरुणीसोबत 5 महिने संबंध ठेवले आणि...

फेसबूकवर मैत्री झाल्यानंतर आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. नतंर सुरु झाला छळ.

Updated: Nov 5, 2022, 11:14 PM IST
फेसबूकवर मैत्री, मग प्रेम... तरुणीसोबत 5 महिने संबंध ठेवले आणि... title=

Crime news : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमात पडलेल्या अनेकांची आतापर्यंत फसवणूक झालीये. फेसबूकवर मैत्री झाल्यानंतर ती त्याच्या प्रेमात पडली. दोघे ही नंतर भेटले. 5 वर्षापासून ते रिलेशनशिपमध्ये होते. लग्नाचं आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आता तरुणीने केला आहे. (Love on Facebook and the start physical torture marathi crime news )

बुलंदशहरमधून ही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीवर लग्नाच्या बहाण्याने पाच महिने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्याने तिला आधी जयपूरला नेले. तरुणीचं येथे 5 महिने शारीरिक अत्याचार केले. पीडित तरुणीने दोन दिवसांपूर्वी छत्री पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली होती.

तरुणीने आरोप केलेत की, जयपूर येथील एका तरुणाने फेसबूकवर तिच्यासोबत मैत्री केली. त्यानंतर त्याने हळूहळू प्रेमप्रकरणात अडकवले. तो तिच्या घरी भेटण्यासाठी आला. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने तो तरुणीला आपल्यासोबत जयपूरला घेऊन गेला. जिथे आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि तिचा मानसिक छळ सुरूच ठेवला.

आरोपी तरुणाच्या चुलत भावांनीही तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने सगळा प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर ते मुलीला घेण्यासाठी जयपूरला पोहोचले असता, तरुणाच्या काकांनी त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर मुलगी वडिलांसोबत घरी परतली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी तरुणासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक जयपूरला रवाना झाले आहे.'