समझौता एक्सप्रेस ब्लास्ट प्रकरणाचा थोड्याच वेळात निर्णय

समझौता एक्सप्रेस ब्लास्ट प्रकरणाची पंचकुलाच्या स्पेशल एनआयए न्यायालयात आज सुनावणी सुरू आहे.

Updated: Mar 11, 2019, 04:06 PM IST
समझौता एक्सप्रेस ब्लास्ट प्रकरणाचा थोड्याच वेळात निर्णय title=

नवी दिल्ली : पानीपतच्या बहुचर्चित समझौता एक्सप्रेस ब्लास्ट प्रकरणाची पंचकुलाच्या स्पेशल एनआयए न्यायालयात आज सुनावणी सुरू आहे. काही वेळातच यासंदर्भातील निर्णय सुनावला जाणार आहे. या सुनावणी दरम्यान असीमानंद देखील न्यायालयात उपस्थित आहेत. या आधीच्या तारखे दिवशी वाद झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता.याप्रकरणातील 8 आरोपींपैकी एकाची हत्या झाली आहे. तिघांना पीओ घोषित करण्यात आले. तर स्वामी असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी हे चार आरोपी आहेत. 26 जुलै 2010 ला हे प्रकरण एनआयएकडे सोपावण्यात आले आणि 26 जून 2011 ला आरोपींविरोधात चार्जशिट दाखल करण्यात आल्याचे एनआयएचे वकील पीके हांडा यांनी सांगितले. 

आरोपींविरोधात आयपीसी कलम 120 B कट रचण्यासोबत 302 हत्या, 307 हत्येचा प्रयत्न करणे आणि विस्फोटक पदार्थ, रेल्वेला झालेल्या नुकसाना बद्दलचे कलम लावण्यात आले आहेत. या आरोपात दोषी ठरलेल्यांना कमीत कमी आजीवर कारावास होऊ शकतो. 

भारत आणि पाकिस्तान यांच्या आठवड्यातून दोन दिवस चालणाऱ्या समझौता एक्सप्रेसमध्ये 18 फेब्रुवारी 2007 ला बॉम्ब ब्लास्ट झाला होता. ही ट्रेन दिल्लीहून लाहोरला चालली होती. हरियाणाच्या पानीपत येथे हा धमाका झाला. यात 68 लोकांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. यात जीव गमावणारे अधिक नागरिक हे पाकिस्तानातील होते. मृत 68 जणांमध्ये 16 मुले तसेच चार रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश होता.