मुंबई : पवित्र रमझानच्या महिन्याचा आज गोड शेवट होत आहे. देशभरात आज ईद उल फित्र साजरी होत आहे.
आज सकाळी दिल्लीतल्या जामा मशीदीसह देशाच्या सर्वच भागात मुस्लिम बांधवांनी ईदेची नमाज अदा केली. यानंतर एकमेकांची तोंडं गोड करुन शुभेच्छा दिल्या.
आजच्या ईद निमित्त अनेक मुस्लिम संघटनांनी हिंसेचा विरोध केला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांनी या पवित्र सणानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.