coronavirus : देशात पहिल्यांदाच मृत्यू दर २.५ टक्क्यांहून कमी; ५ राज्यामध्ये एकही मृत्यू नाही

29 राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांमधील मृत्यूचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी झालं आहे.

Updated: Jul 19, 2020, 05:32 PM IST
coronavirus : देशात पहिल्यांदाच मृत्यू दर २.५ टक्क्यांहून कमी; ५ राज्यामध्ये एकही मृत्यू नाही title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. परंतु कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण घटलं असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. पहिल्यांदाचं देशातील मृत्यू दर 2.5 टक्क्यांहून खाली आला आहे. 29 राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांमधील मृत्यूचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी झालं आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचा समावेश आहे.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या प्रभावी क्लिनिकल मॅनेजमेंटबाबत, केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतातील मृत्यूचं प्रमाण 2.5 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. प्रभावी कंटेनमेंट स्ट्रॅटेजी, अनेक चाचण्या आणि स्टँडर्ड क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल्समुळे मृतांच्या संख्येत कमी आली आहे.

कोरोनाच्या मृत्यू दरात सतत घट होत आहे. भारत जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, कोरोना चाचण्यांची वाढती संख्या आणि रुग्णालयांची पायाभूत सुविधा सुधारल्यामुळे हे शक्य झाले आहे. ज्या लोकांना कोरोनाचा अधिक धोका आहे, अशा लोकांना शोधून काढण्यासाठी अनेक राज्यांनी लोकसंख्येचं सर्वेक्षण केलं. याअंतर्गत वृद्ध, गर्भवती महिला आणि ज्या लोकांना आधीच इतर आजार आहेत, त्यांची ओळख पटली. त्यानुसार, हाय रिस्क असलेल्या लोकांना ऑब्जर्वेशनमध्ये ठेवण्यात आलं. त्यामुळे, सुरुवातीच्या अवस्थेत रोगाचा शोध आणि वेळेवर उपचार करुन लोकांचा जीव वाचवण्यात आला.

29 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मृत्यूचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी 2.49 टक्के इतका आहे. 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मृत्यू दर 0 आहे. तर 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मृत्यू दर 1 टक्क्याहूनही कमी आहे.