Vaccination च्या वेळी सुंदर महिलेने पाहिली सुई; पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा....

उफ्फ तेरी अदा.... 

Updated: Aug 30, 2021, 09:52 PM IST
Vaccination च्या वेळी सुंदर महिलेने पाहिली सुई; पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा....  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेला देशभरात वेग आलेला असतानाच, आता लसीकरणाबाबत समाजात असणारी भीती कमालीची कमी झालेली आहे. परिणामी लस घेण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक पुढे येत आहे. 

लस घेताना अनेकजण फोटो आणि व्हिडीओ काढत तो सोशल मीडियावर शेअरही करत आहेत. इतरांच्या मनात असणारी लसीबाबतची भीती आणि लसीकरणानंतरच्या परिणामांबद्दलचा गोंधळ दूर करणं हा यामागचा प्राथमिक हेतू. पण, सध्या मात्र लसीकरणाच्या वेळीचा एक व्हिडीओ भलत्याच कारणामुळे व्हायरल होत आहे. 

लस घेण्यासाठी गेलं असता अनेकांनातच सुई पाहूनच धडकी भरते. मग पुढे काय होतं, हे ज्याचे त्याचे अनुभवाचे बोल. पण, इथं मात्र ममता मकवाना नावाच्या एका अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये ही महिला लस घेण्यासाठी गेली असता आरोग्य प्रतिनिधींच्या हातात इंजेक्शनची सुई पाहून चांगलीच घाबरते. 

भीतीपोटी ती तिचे डोळेही मिटून घेते आणि क्षणार्धातच लस घेतली हे तिला कळतही नाही. या साऱ्यामध्ये या महिलेचं सौंदर्य आणि तिच्या अदा, तिचं निरागस रुप नेटकऱ्यांच्या काळजाचा ठाव घेत आहे. 

गुलाबी साडीमध्ये या महिलेचं सौंदर्य आणखी खुलून आल्याचं दिसत आहे. तिच्या अदा पाहताना अरे किती हा निरागसपणा, अशाच प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं लाईक्स मिळाले आहेत. तुम्ही लसीकरणाच्या वेळी अशा कोणत्या प्रसंगाला सामोरे गेले आहात का?