चिंताजनक ! देशात कोरोना संक्रमितांची संख्या ६ लाखांच्या वर

देशात कोरोना रुग्णांची वाढ थांबेना...

Updated: Jul 1, 2020, 10:11 PM IST
चिंताजनक ! देशात कोरोना संक्रमितांची संख्या ६ लाखांच्या वर title=

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 6 लाखांच्या वर गेली आहे. गेल्या २४ तासात राजधानी दिल्लीत कोरोनाचे 2,442 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 89,802 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 5,537 नवे रुग्ण आढळले आहेत.

बुधवारी रात्रीपर्यंत देशात कोरोना रूग्णांची संख्या 6 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशात 6,01,952 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 3,57,612 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर 17,785 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात सध्या 2,26,489 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत मृतांचा आकडा 2,803 वर पोहचला आहे. दिल्लीत आतापर्यंत 59,992 लोक बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात आता ज्या महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा भागात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तो़डण्यासाठी अनेक महापालिकांनी १० दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. 

देशात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे. त्यातच मुंबई आणि उपनगरामध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासनापुढे आता नवं आव्हान तयार झालं आहे. लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागल्याने कोरोना रुग्णांची वाढ होत आहे.