नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. नागरिक अनेक ठिकाणी अडकले आहेत. यासर्वामध्ये हातावर पोट असलेल्या मजुरांचे हाल होत आहेत. औरंगाबाद येथे मालगाडी खाली आलेल्या मजुरांच्या घटनेनंतर याची दाहकता संपूर्ण देशाला कळाली. पण परिस्थितीत अद्यापही बदल झालेला नाही. आजही शेकडो मजुर पायीच आपल्या गावी चालले आहेत. अशावेळी त्यांना अनेक कठीण प्रसंगाना तोंड द्यावे लागत आहे.
अनेक मजुरांच्या पायातील चप्पल चालून चालून झिंजल्या आहेत. पंजाबहून पायी निघून हरियाणासाठी प्रवास करणाऱ्या मजुरांची व्यथा दाखवणारे फोटो समोर आले आहेत. चालून चालून या मजुरांच्या पायातील चप्पल झिंजल्या आहेत.
पोलीसांनी तंबी दिल्यानंतर पळण्याच्या नादात रस्त्यामध्येच काही मजुरांच्या चप्पल अस्थाव्यस्थ पाहायला मिळाल्या. त्यामुळे अनेक मजुर तर अनवाणीच गावपर्यंतचा प्रवास करत आहेत. तर दुसरीकडे काही मजुरांनी हार मानली नाही.
त्यांनी प्लास्टिकच्या बॉटल पायात बांधून त्याचीच चप्पल बनवली आणि मार्गस्थ झाले आहेत.
अंबालाचे आमदार असीम गोयल यांनी या प्रवाशांचे हालत पाहीले. त्यांनी या मजुरांना भेट देऊन चप्पल वाटल्या. तसेच या मजुरांना गावी जाऊ दे अशी आवाहन त्यांनी पंजाब पोलिसांना केले.