CORONA : वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकार चिंतेत, कॅबिनेट सचिवांच्या राज्यांना सू

कॅबिनेट सचिवांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.

Updated: Apr 2, 2021, 07:08 PM IST
CORONA : वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकार चिंतेत, कॅबिनेट सचिवांच्या राज्यांना सू title=

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू लागला आहे. केंद्र सरकार याबाबत सर्व राज्यांतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कॅबिनेट सचिवांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत कोरोना साथीचा संसर्ग रोखण्यासाठी आणि लसीकरण अधिक तीव्र करण्याच्याबाबतीत चर्चा झाली.

सुमारे २ तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या बैठकीत केंद्र सरकारने कोविड १९ चे प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. कॅबिनेट सेक्रेटरी म्हणाले की, कोरोना प्रोटोकॉलचे पालन केल्याशिवाय कोरोनाला रोखणं अशक्य आहे.

कॅबिनेट सेक्रेटरी म्हणाले की, सर्व राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात ट्रेस, ट्रॅक आणि उपचार या सूत्रावर काम केले पाहिजे. ते म्हणाले की, जे लोक मास्क वापरत नाहीत आणि सामाजिक अंतर पाळत नाहीत त्यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे.

राज्यांच्या मुख्य सचिवांना सांगितले की, वेगाने वाढणार्‍या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करावयाच्या आहेत ते ते अवलंबू शकतात. कॅबिनेट सेक्रेटरी म्हणाले की, काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत राज्यांच्या मुख्य सचिवांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

कॅबिनेट सचिवांनी राज्य सरकारांना कोरोना व्हायरसबाबत खबरदारी घ्यायला हवी आणि संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र करण्यास सांगितले. यापूर्वी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॉर्म्युल्यावर वेगाने करण्याचे आवाहन केले होते.