काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्याचे मोठे षड्यंत्र उघड, 10 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी जाहीर

 जम्मू -काश्मीर पोलिसांनी (Jammu Kashmir Police) 10 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. यादीत नवीन आणि जुने दोन्ही दहशतवाद्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

Updated: Aug 3, 2021, 07:22 AM IST
काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्याचे मोठे षड्यंत्र उघड, 10 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी जाहीर title=

 श्रीनगर :  जम्मू -काश्मीरमधून  (Jammu Kashmir) दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दल सातत्याने ऑपरेशन क्लीन चालवत आहेत. ज्याअंतर्गत खोऱ्यात दहशत पसरवणाऱ्या कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे. दरम्यान, जम्मू -काश्मीर पोलिसांनी (Jammu Kashmir Police) 10 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. यादीत नवीन आणि जुने दोन्ही दहशतवाद्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

खोऱ्यात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे हे दहशतवादी वेगवेगळ्या संघटनांशी संबंधित आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलीस सातत्याने शोधमोहीम राबवत आहेत. (terrorism in Kashmir)आयजी काश्मीर पोलीस विजय कुमार (Vijay Kumar) यांनी 10 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे, काही जुनी आणि काही नवीन नावांचा समावेश आहे. या यादीमध्ये जैश-ए-मोहम्मद (JeM), लष्कर-ए-तैयबा (LeT), हिजबुल मुजाहिदीन आणि अल बद्र या दहशतवाद्यांचा समावेश आहे.

हे  लोक आहेत  घाटीत दहशत पसरवत आहेत

जम्मू -काश्मीर पोलिसांच्या या यादीत जुन्या दहशतवाद्यांची नावे आहेत सलीम पर्रे, युसूफ कांट्रो, अब्बास शेख, रियाज शेटेरगुंड, फारूक नाली, जुबैर वानी आणि अशरफ मोलवी यांची नावे असून साकीब मंजूर, उमर मुस्ताक खांडे आणि वकील शाह यांचा या यादीत नवीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. 

जम्मूमध्ये ड्रोनच्या माध्यमातून दहशत

दरम्यान, जम्मूमध्ये ड्रोनद्वारे दहशत पसरवण्याचे काम सुरु आहे. सोमवारी संध्याकाळी हिरानगर सेक्टरच्या बनियाडीमध्ये ड्रोन दिसल्याने खळबळ उडाली. माहितीनुसार, चार ठिकाणी सुरक्षा दलांच्या जागांवर ड्रोन घिरट्या घालताना दिसले, त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरु केली.