नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसही सक्रीय झाले आहे. आता काँग्रेसने आता आपले स्टार प्रचारक जाहीर केले आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक कोण असणार याची उत्सुकता संपली. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी असणार आहेतच.
बिहार विधानसभा निवडणूक तीन टप्प्यात पार पडणार आहे. २८ ऑक्टोबर पहिल्या टप्प्यातील, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
Congress releases list of star campaigners for upcoming #BiharElections2020 ; the list includes Sonia Gandhi, Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra, Ghulam Nabi Azad, Sachin Pilot and Shatrughan Sinha pic.twitter.com/jGEqWcLy6L
— ANI (@ANI) October 10, 2020
तसेच स्टार प्रचारक म्हणून गुलाम नबी आझाद, सचिन पायलट आणि शत्रुघ्न सिन्हा यांचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अशोक गेहलोत, तारिक अन्वर, रणदीप सुरजेवाला हे सगळेही स्टार प्रचारक असणार आहेत.
कोरोना पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक होत असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने कोरोना रुग्णांना मतदानापासून राहावे लागू नये म्हणून विशेष व्यवस्था केली आहे. दरम्यान भाजपा आणि जदयू यांनी युती केली आहे. त्याआधी भाजपला दोन राजकीय पक्षांनी सोडचिट्ठी दिली आहे.
भाजपा आणि जदयू यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. पुन्हा एकदा आमचीच सत्ता येणार असाही दावा करण्यात आला आहे. आता काँग्रेसचे स्टार प्रचारक विरुद्ध भाजपाचे दिग्गज असा सामना निवडणूक रिंगणात पाहायला मिळणार आहे.