गुजरात निकालानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा

गुजरातच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेण्याची जबाबदारी आता खुद्द राहूल गांधी यांनी स्विकारलीय.

Updated: Dec 23, 2017, 07:06 PM IST
गुजरात निकालानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा title=

सुरत : गुजरातच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेण्याची जबाबदारी आता खुद्द राहूल गांधी यांनी स्विकारलीय.

गुजरात निकालानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी गुजरात दौ-यावर आहेत. 

गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी सर्वप्रथम सोमनाथ मंदिरात दर्शन घेतलं. राहुल गांधींच्या हस्ते यावेळी विशेष पूजाअर्चा करण्यात आली.

गुजरात निवडणूक प्रचारा दरम्यान राहुल गांधीनी सोमनाथ मंदिरात दर्शन घेतल्यावर त्यावरुन बरीच खळबळ झाली होती. 

सोमनाथ मंदिरातील दर्शनानंतर राहूल गांधी अहमदाबादमध्ये तिथे विभागवार नेते, आमदार आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

गुजरात निकालानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा