भोपाळ : देशात नुकत्याच झालेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या अड़चणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. काँग्रेस नेतृत्वावर आता दबक्या आवाजात प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. काही नेते आता उघडपणे यावर बोलत आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अरुण यादव (Arun Yadav) यांच्या एका ट्विटने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. (Congress Leadership Crisis)
त्यांनी ट्विट करत म्हटलं की, 'किसको फिकर है वंश की'. या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना असतानाच हे ट्विट आले आहे. राज्याच्या राजकारणात शांत राहून आपला मुद्दा मांडणारा नेता म्हणून अरुण यादव यांची ओळख आहे. त्यांच्या समर्थकांची आणि चाहत्यांची मोठी यादी आहे.
काँग्रेसमधील राष्ट्रीय नेतृत्वाच्या भांडणामुळे काँग्रेस नेते दु:खी झाले आहेत. अरुण यादव यांचे हे एक ट्विट बरंच काही सांगून जात आहे. नेत्यांना केवळ पद मिळवण्याची चिंता आहे, पक्षाची नाही, असे स्पष्टपणे ते सूचित करत आहेत.
किसको फिक्र है कि "कबीले" का क्या होगा..!
सब इसी बात पर लड़ते है कि "सरदार" कौन होगा..!!@INCIndia @INCMP @RahulGandhi— Arun Subhash Yadav (@MPArunYadav) March 16, 2022
अरुण यादव यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'कुळाचे काय होईल याची कोणाला पर्वा आहे.! 'सरदार कोण होणार' यावर सगळेच भांडत आहेत. या ट्विटमध्ये यादव यांनी मध्य प्रदेश काँग्रेस, अखिल भारतीय काँग्रेस आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना टॅग केले आहे.
माजी मंत्री अरुण यादव यांची गणना राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये केली जाते. ते प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या काही काळापासून ते पक्षातून बाजूला झाले आहेत.