राहुल गांधी यांनी गोव्यावरुन आणला 'या' खास जातीचा श्वान, राष्ट्रपतींनी केला होता सन्मान

काँग्रेस नेता राहुल गांधी गोव्यावरुन दिल्लीला परतले. पण गोव्यावरुन येताना त्यांनी जॅक रसेल टेरियर जातीचा श्वान खरेदी केला. या श्वानाबरोबरचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

राजीव कासले | Updated: Aug 4, 2023, 01:57 PM IST
राहुल गांधी यांनी गोव्यावरुन आणला 'या' खास जातीचा श्वान, राष्ट्रपतींनी केला होता सन्मान title=

Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका खास कारणाने गोवा दौरा केला. गोव्यावरुन पतताना त्यांनी आपल्याबरोबर एक खास पाहुणा सोबत आणला. या पाहुण्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. राहुल गांधी यांनी गोव्यावरुन आपल्यासोबत जॅक रसेल टेरियर (jack russell terrier) जातीचा श्वान नवी दिल्लीतल्या आपल्या घरी आणला आहे. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral Photo) झाला आहे. या फोटोत राहुल गांधी यांच्या हातात तीन महिन्यांचा जॅक रसेल जातीचं पिल्लू आहे. गोव्यातील डॉग हाऊसमधून त्यांनी दोन पिल्लं विकत घेतली आहेत. पण प्लाईटमध्ये एक प्रवासी केवळ एक श्वान घेऊन जाऊ शकत असल्याने राहुल गांधी यांनी आपल्यासोबत एकच श्वान नेला. दुसरा श्वान नंतर त्यांच्याकडे पोहोचवला जाणार आहे. 

गोव्यात शिवानी पित्रे नावाच्या महिला पती स्टॅनली ब्रँगेंजा यांच्याबरोबर डॉग हाऊस चालवातात. राहुल गांधी स्वत: आल्याने त्या खूप आनंदी होत्या. रलेस टेरियर्स जातीच्या श्वानाच्या चौकशीसाठी राहुल गांधी यांच्या कार्यालयातून आधी शिवानी पित्रे यांना फोन करण्यात आला होता. त्यानंतर राहुल गांधी यांचा एका प्रतिनीधी गोव्यात आला होता. त्यांनी या श्वानांची संपूर्ण माहिती घेतली आणि राहुल गांधी यांना पाठवली. पण राहुल गांधी यांना स्वत: येऊन पाहायचं होतं. त्यामुळे गुरुवारी सकाळी नऊ वाजात राहुल गांधी गोव्यातील मोपुसा इथल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आणि तिथून रस्ते मार्गे ते शिवानी पित्रे यांच्या डॉग हाऊला पोहोचले. 

डॉग हाऊसला पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी आपला बराच वेळ तिथल्या श्वानांबरोबर खेळण्यात घालवला. राहुल गांधी स्वभावाने खुपच विनम्र आणि शांत असल्याचं शिवानी पित्रे यांनी सांगितलं. त्यांनी पित्र कुटुंबियांशी गप्पा मारल्या तसंच त्यांच्याबरोबर फोटोही काढले.

जॅक रसेलचं वैशिष्ट्य
जॅक रसेल टेरियर हा श्वान इंग्लिश ब्रीड आहे. त्याकाळी जंगलात कोल्ह्यांची शिकार करण्यासाठी त्यांना तयार करण्यात आलं होतं. या जातीच्या श्वानांची दृष्टी आणि गंधाची चांगली शक्ती असते. शिवाय हा श्वान खूप समझदार असतो. युक्रेनचे राष्टपदी व्लादिमीर झेलेन्स्की यांनी जॅक रसेल टेरियर जातीच्या श्वानांचा पदक देऊन सन्मान केला होता. रशियाच्या सैन्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा या श्वानांच्या मदतीने शोध लावण्यात आला होता. 

आमदारांबरोबर डिनर
काँग्रेस खासदार राहुल गांधी 2 ऑगस्टच्या रात्री गोव्यातील दाबोलीन विमानतळावर पोहोचले. त्यानंतर ते पणजीमधल्या एका हॉटेलमध्ये थांबले. इथे त्यांनी गोव्यातील काँग्रेसचे आमदार आणि प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांनी जेवणही घेतलं. गोव्यात काँग्रेसचे तीन आमदार आहेत.