75 ते 1 हजारांपर्यंतची स्मारक नाणी हवी आहेत ?, करा फक्त एवढंच

तुम्हाला हे नाणे हवे असल्यास त्याची अगाऊ बुकिंग करावी लागले.

& Updated: Dec 31, 2018, 07:09 PM IST
75 ते 1 हजारांपर्यंतची स्मारक नाणी हवी आहेत ?, करा फक्त एवढंच title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्ट ब्लेयरमध्ये 75 रुपयांचे नाणी जारी केले. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेयरमध्ये पहिल्यांदा तिरंगा फडकवल्याच्या घटनेला 75  वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून हे नाणे जारी करण्यात आले. याआधी पंतप्रधानांनी 24 डिसेंबरला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे चित्र असेलेलं शंभर रुपयांचे नाणे जारी केले होते. स्मारक नाणी ही सर्वसाधारण नाण्यांप्रमाणे नसतात. यांचे मुल्य हे सध्या चलनात असलेल्या नाण्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. अशा नाण्यांची मुळ किंमत जास्त असल्याने रिझर्व सर्वसाधारण नागरिक हे नाणे रिझर्व बॅंकेने निर्धारित केलेल्या किंमतीत खरेदी करतात. अटल बिहारी वाजपेयींच्या नावे जारी केलेल्या शंभर रुपयांच्या नाण्याची किंमत साडेतीन हजार रुपये आहे. याचा अर्थ हे नाणे खरेदी करण्यासाठी तुम्हाला शंभर नाही तर साडे तीन हजार इतरी रक्कम द्यावी लागेल.  त्यामुळे ही नाणी चलनात नसतात. 

75 ते 100 रुपयांपासूनची नाणी भारत सरकारने जारी केली आहेत. 2014 मध्ये पंडीत जवाहरलाल नेहरू आणि 2015 मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या औचित्याने 125 रुपयांचे नाणे जारी केले होते. 2010 पासून 2013 पर्यंत सरकारतर्फे वेगवेगळ्या औचित्याने 150 रुपयांचे नाणे जारी करण्यात आले. 2011 मध्ये रविंद्रनाथ टागोर यांच्या 150 व्या जयंती आणि कॅगच्या स्थापनेनिमित्त 2012 मध्ये मोतीलाल नेहरू ,मदन मोहन मालवीय यांच्या 150 व्या जयंतीवर आणि 2013 मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीवर नाणी जारी करण्यात आली. 

अटलजींच्या आठवणीत शंभर रुपयांचं नाणं जारी

2010 मध्ये आरबीआय स्थापनेच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75 रुपयांचे नाणे जारी करण्यात आले. आता पर्यंतचे सर्वात महाग नाणे हे हजार रुपयांचे होते. तामिळनाडूच्या प्रसिद्ध आणि प्राचीन बृहदीश्वरा मंदिर निर्माणाच्या 1 हजार वर्षपूर्तीनंतर हे नाणे जारी करण्यात आले होते.

असे मिळवा स्मारक नाणे 

तुम्हाला हे नाणे हवे असल्यास त्याची अगाऊ बुकिंग करावी लागले. भारतीय रिझर्व बॅंकच्या कोलकाता आणि मुंबईतील भारत सरकारच्या 'मिंट ऑफिस स्पेशल एडिशन' नाणी आणि स्मारक नाणी जारी करते. भारतीय प्रतिभूति मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेड अंतर्गत हे येते. ही नाणी हवी असल्यास वेबसाईटवर अर्ज करावा लागतो. केवळ नोंदणी असलेले ग्राहकच स्मारक नाण्यासाठी अर्ज करु शकतात. आरबीआयच्या वेबसाईटवर कोणीही अर्ज करु शकते.