महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये 'सर्जिकल स्ट्राइक' दिवस होणार साजरा

यापुढं हा दिवस दरवर्षी महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये साजरा करण्यात येणार

Updated: Sep 21, 2018, 03:31 PM IST
महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये 'सर्जिकल स्ट्राइक' दिवस होणार साजरा  title=

नवी दिल्ली : भारतानं पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा दिवस दरवर्षी महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये साजरा करण्यात यावा, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेत. २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय कमांडोंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चार तासांत ही कारवाई केली होती. त्यात पाकिस्तानचे ९ सैनिक आणि ५० अतिरेकी ठार झाल्याचं जाहीर करण्यात आलं. यापुढं हा दिवस दरवर्षी महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये साजरा करण्यात येणार आहे.

सर्जिकल स्टाइक म्हणजे काय? 

कोणत्याही प्रतिबंधीत क्षेत्रात लष्कर शत्रूला किंवा दहशतवाद्यांना नुकसान पोहचविण्यासाठी त्यांना ठार करण्यासाठी सैनिकी कारवाई करते त्याला सर्जिकल स्टाइक म्हटले जाते. 

- ज्या ठिकाणी कारवाई केली जाते. त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती गोळा केली जाते. 

- त्यानंतर कारवाईची वेळ ठरवली जाते. 

- या कारवाईची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाते. याची सूचना काही ठरावीक लोकांनाच असते. 

- सर्जिकल स्टाइकमध्ये ज्या ठिकाणी हल्ला करायचा असतो, नेमकं त्यालाच लक्ष्य केले पाहिजे. त्यामुळे केवळ दहशतवादी ठार होतील इतर नागरिकांना काहीही नुकसान होणार नाही. 

- भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत केवळ दहशतवाद्यांनाच ठार मारण्यात आले. 

- भारताच्या स्पेशल कमांडो पथकाने या सर्जिकल स्टाईकला मूर्तरूप दिले आहे. 

- गेल्या वर्षी जूनमध्ये भारतीय लष्कराने म्यानमारच्या लष्करात सामील होऊल पूर्वोत्तरमधीळ काही दहशतवाद्यांना ठार केले होते.